JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Marathi Bhasha din : 'लई नाही मागणं...' दासू वैद्य यांनी कवितेतून मांडला सामाजिक प्रश्न! Video

Marathi Bhasha din : 'लई नाही मागणं...' दासू वैद्य यांनी कवितेतून मांडला सामाजिक प्रश्न! Video

Marathi Bhasha Din 2023 : मराठी राजभाषा दिनानिमित्त औरंगाबादचे सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी त्यांची कविता सादर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर, 27 फेब्रुवारी : ज्येष्ठ लेखक, कवी, नाटकार  विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा दरवर्षी मराठी राजभाषा दिन म्हणून सादर केला जातो. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्याला बहुमोल्य असं योगदान आहे. मराठीतील सर्वकालीन महान साहित्यिकामध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि मराठी भाषेचा प्रसार व्हावा या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनानिमित्त  छत्रपती संभाजी नगरचे सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी त्यांची कविता सादर केली आहे. दासू वैद्य हे मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार आहेत आतापर्यंत त्यांनी एकांकिका ,नभोनाट्य, बालसाहित्य, चित्रगीत लेखन केले आहे. Marathi Bhasha din : कुसुमाग्रज यांच्या आठवणी जपणारं घर, पाहा वैभवशाली वारसा Video

दासू वैद्य यांची कविता

कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणे, शब्दांना मुंग्या लागतात अवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी. घरोघर खूणटाळाला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावी पोरांना भिरभिर घेण्यासाठी चिमूरडांचे खिसे भरून राहावेत चॉकलेट गोळ्यांनी सकाळी वेचंलेल्या पारिजातकाचा वास पोरींच्या ओच्चाना राहावा दिवसभर लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात दिवसांच्या भाकरीबरोबर खायला असावं यच्चयावत प्रार्थनांचं खमंग पिठलं जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात तहानल्यांची ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेने. बंदुकीच्या नळकांडीत चिमण्यानी करावा खोपा, बॉम्बची व्हावेत रंगीबिरंगी फुगे, झेंड्यांना दाखवावी दिशा वाऱ्याची लुब्ध असावीत माणसं एकमेकांवर अंधारात कांहण ऐकू याव उजेडात जागतिक संगीताचा गोपाळकाला केल्यावर सापडावी लय श्वासांची पृथ्वी नावाचा गोल गप्पा टम्म भरलेला असावा, जगाचा आंबट गोड पाण्याने लई नाही, लई नाही मागणं फक्त पेरलेल्या दानांना नित्य फुटावेत दोन कोळी पान आणि माती कंटाळून नये झाडांच्या बाळंतपणाला लई नाही, लई नाही मागणं. Marathi Bhasha din : संदीप खरेंनी सादर केली Exclusive कविता, पाहा Video

 आपण शहरात  दिव्यांच्या खांबाना मोठ्या प्रमाणामध्ये झेंडे लागलेले पाहतो. अनेक दिव्यांच्या खांबांना दिवा नसतो मात्र झेंडे असतात. झेंड्यांनी मानवी समाजामध्ये काही विशेष हे नसतं मात्र फक्त ते प्रतिकात्मक असतं.  या झेंड्यांनी आपल्यामध्ये इतकी दुही माजवली आहे की हा त्यांचा झेंडा हा यांचा झेंडा यातून माणूस नावाची जमात त्रस्त झाली आहे असं मला वाटलं. शेवटी आपण सगळी माणस आहोत मात्र झेंड्याच्या रंगावर जर आपण आपसात भांडायला लागलो तर झेंड्यपेक्षा मला प्रकाश देणारा दिवा महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे मी ही कविता लिहिली असं वैद्य यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या