जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Marathi Bhasha din : कुसुमाग्रज यांच्या आठवणी जपणारं घर, पाहा वैभवशाली वारसा Video

Marathi Bhasha din : कुसुमाग्रज यांच्या आठवणी जपणारं घर, पाहा वैभवशाली वारसा Video

Marathi Bhasha din : कुसुमाग्रज यांच्या आठवणी जपणारं घर, पाहा वैभवशाली वारसा Video

Marathi Bhasha din 2023 : कुसुमाग्रज यांच्या नाशिक मधील राहत्या घरातील आठवणी आजही कायम आहेत.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 27 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी तसेच साहित्यिक वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसानिमित्त 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मोठं काम केलं आहे. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज यांच्या नाशिक मधील राहत्या घरातील आठवणी आजही कायम आहेत. या वास्तूला विशेष महत्त्व  कवी कुसुमाग्रजांनी अनेक दिवस या घरात वास्तव्य केलेल आहे. त्यांनी वापरलेल्या साहित्याचे अद्यापही कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जतन केलं आहे. राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक लेखक, कवी, साहित्यिक कुसुमाग्रजांच्या घरी येऊन नतमस्तक होत असतात. त्यांच्या अनेक आठवणी आजही या ठिकाणी कायम आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर या वास्तूचे रूपांतर हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झाले आहे. तीर्थस्थान म्हणून याकडे बघितलं जातं, या वास्तूला विशेष महत्त्व आहे अशी माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सदस्य मकरंद हिंगणे यांनी दिली आहे.

    Marathi Bhasha Din : भाषा दिनानिमित्त WhatsApp Statusला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश

     गाजलेल्या साहित्यकृती कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे लाडके कवी, साहित्यिक, कादंबरीकार, थोर लेखक नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक कादंबऱ्या, कविता, निबंध, लघुकथा, नाटक, यांचं प्रभावीपणे लेखन केलेल आहे. त्यांचे नटसम्राट हे नाटक आणि 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी विशाखा कवितासंग्रह या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत.

    Marathi Bhasha din : संदीप खरेंनी कवितेतून उभा केला ‘बालपणीचा सुखाचा काळ’ पाहा Video

    कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उपक्रम  मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच मराठी भाषा वाचली गेली पाहिजे. तेव्हाच ती टिकेल ती समृद्ध होईल. या हेतूने कुसुमाग्रज प्रतिष्ठांनने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी देशभरातच नव्हे तर जगभरात आपली पुस्तकं पाठवली आहेत. अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. ही वाचन चळवळ पुढे अविरतपणे सुरू ठेवायची आहे अशी प्रतिक्रिया कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सदस्य विनायक रानडे यांनी दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात