सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च : बदलत्या जीवनशैलीमुळे काही आजारांमध्ये वाढ झाली. स्थुलपणा ही यामधील एक प्रमुख समस्या समोर आली आहे. आता ही समस्या फक्त मोठ्यांपूरती मर्यादीत न राहता मुलांमध्येही वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील काही शाळांची प्रातिनिधिक तपासणी केल्यानंतर याबाबतची काळजी करणारी आकडेवारी समोर आली आहे. काय आहे आकडेवारी? वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातर्फे संपूर्ण राज्यांमध्ये तपासणी करण्यात आली यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातर्फे देखील शाळांची निवड करून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाच शाळांची नोंदणी करण्यात आली आणि त्यातील 559 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये पाच शाळांमधील 12 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये वयानुसार वजनानुसार बॉडी मास इंडेक्समध्ये विद्यार्थ्यांना स्वतःच्या आरोग्य बाबत माहिती देण्यात आली. या तपासीमध्ये शंभर पैकी पाच विद्यार्थी हे अतीलठ्ठ असल्याचं उघड झालंय. यावेळी झालेल्या तपासीमध्ये 322 मुलांपैकी 21 तर 267 मुलींपैकी 6 जणी या अतीलठ्ठ असल्याचं आढळलं. एकूण पाच शाळांमध्ये ही तपासणी झाली. या पाच शाळांमधील 27 मुली या अतीलठ्ठ आढळल्या आहेत. सौंदर्यप्रसाधनं निवडताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम! वजन वाढणे म्हणजे धोका! बदलती जीवनशैली आणि आहारांमधील अनियमित प्रमाण यामुळे कमी वयामध्ये लठ्ठपणा आढळून येतो. लहान वयात लठ्ठपणा आढळून येणे एक धोक्याची घंटा आहे. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढल्यानंतर ब्लड प्रेशर,रक्तातील चरबीचे प्रमाण वाढत जातं. त्यामधूल मधुमेह,सांधेदुखी इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. काय उपाय करणार? वजन वाढू नये यासाठी पालकांनी मुलांना बाहेरील फास्ट फूड खाण्यासाठी देऊ नये. विद्यार्थ्यांना पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, यासोबतच घरातील जेवण देण्यास प्राधान्य द्यावे हे केल्यानंतर मुलांच्या वजन वाढण्याची समस्या टाळता येऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं. H3N2 पासून कसा बचाव करावा? IMA च्या माजी अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video लहान मुलांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत आहे यामुळे आजार देखील वाढतात यामुळे आम्ही सर्वेक्षण केलं यामध्ये काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये लटकेच प्रमाण आढळून आला आहे यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना फास फूड खाणं टाळावं घरातील खाद्यपदार्थ खायला द्यावेत जेणेकरून वजन वाढणार नाही आणि भविष्यातील धोके टाळता येतील असं घाटी रुग्णालयातील जन औषध विभागाचे प्राध्यापक डॉ.राजेंद्र अंकुशे यांनी सांगितले.