JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : 'चल पैसे निकाल'; फायनान्स कार्यालयात घुसून गोळीबार, छ. संभाजीनगर हादरलं

Video : 'चल पैसे निकाल'; फायनान्स कार्यालयात घुसून गोळीबार, छ. संभाजीनगर हादरलं

छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा शहर हादरलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर 11 मार्च, अविनाश कानडजे :  छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा शहर हादरलं आहे. सिडको परिसरातील शुभ फायनान्सच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोर शुभ फायनान्सच्या कार्यालयात घुसले, त्यानंतर त्यांनी पैशांची मागणी करत कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. मात्र सुदैवानं नेम चुकल्यानं ही गोळी भीतींत घुसल्यानं कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात शुभ फायनान्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. हल्लेखोरांनी फायनान्सच्या ऑफीसमध्ये घूसून पैसे निकाल म्हणत पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. मात्र नेम चुकल्यानं या हल्ल्यातून कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

सासरवाडीच्या छळाला कंटाळला; तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल, छ. संभाजीनगरात खळबळ परिसरात दहशतीचं वातावरण या घटनेत कर्मचारी थोडक्यात बचावल्यानं परिसरात दहशतीचं वातावण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुजेच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या