औरंगाबाद, 12 फेब्रुवारी, अविनाश कानडजे : आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याजागी नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं काय म्हणाले खैरे? खैरे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर भाजपच्या वरिष्ठांचा खूप दबाव आहे, त्यामुळे मला हे असं वागावं लागतं असं भगतसिंह कोश्यारी यांनी मला सांगितलं होतं, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच भाजपने राज्यपाल बदलण्याचा निर्णय खूप उशिरा घेतला, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे त्या पदाची काय अवस्था आज झाली आहे? लोकांना आंदोलने करावी लागली, निषेध करावा लागला असा टोलाही खैरे यांनी भाजपला लगावला आहे. हेही वाचा : कोश्यारींचा राजीनामा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आता नव्या राज्यपालांनी.., संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया ‘नव्या राज्यपालांनी दबावाला बळी पडू नये’ पुढे बोलताना ते म्हणाले की, आता नव्या राज्यपालांनी तरी कोश्यारींसारखं वागू नये, जर भाजपने तुमच्यावर दबाव टाकला तर तुमचे नाव अशा प्रकारे खराब होऊ शकते. त्यामुळे राज्यपालांनी दबावाला बळी पडू नये असं खैरे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : Bhagat Singh Koshyari Resign : भगतसिंह कोश्यारी यांची 5 वादग्रस्त वक्तव्य ज्यामुळे ते चर्चेत आले सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा म्हणजे देर आये पर दुरूस्त आये असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.