बुलडाण्यात दारूड्याचा हल्ला
बुलडाणा, 24 फेब्रुवारी, राहुल खंडारे : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंगणात झोपलेल्या तब्बल आठ जणांवर दारुड्यानं जीवघेणा हल्ला केला आहे. लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. अखेर ग्रामस्थांनी या दारूड्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भालेगाव बाजारमधील घटना घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार या गावातील ही घटना आहे. घरात उकडा जाणवत असल्यानं सर्व जण बाहेर अंगणातच झोपले होते. दरम्यान पहाटे तीनच्या सुमारास अंगणात झोपलेल्यांवर दारूड्यानं अचानक हल्ला केला. त्याने लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली. बेसावध असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये कोणाचे डोके फुटले आहे, तर कोणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा बळी; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल उपचार सुरू या घटनेमधील सर्व जखमींना आधी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यानंतर यातील काहींना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर मेडिकल कॉलेजला हलवण्यात आलं आहे. मोठ्या हिमतीने गावातील नागरिकांनी या दारुड्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गणेश दीवनाले असं या दारुड्याचं नाव आहे.