अमरावती, 8 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो. फेब्रुवारी महिन्यातच प्रेमाचा उत्सव अर्थात व्हॅलेनटाईन डे असतो. कपल्स आपला व्हॅलेनटाईन डे कसा हटके साजरा होईल याचं प्लॅनिंग महिनाभर आधीपासूनच सुरू करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे अमरावतीच्या श्रद्धा मस्के आणि अमेरिकेतील अँड्र्यू रॉबिन्सन या तरुणाचा गेल्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी अमरावतीमध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं होतं. आता ते आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुन्हा अमरावतीमध्ये आले आहेत. गाण्याचा व्हिडीओ व्हायरल त्यांचा एक व्हिडीओ व्हायरलं होत आहे, या व्हिडीओमध्ये ते बिलनशी नागिन निघाली या गाण्यावर झिंगाट डान्स करताना दिसत आहेत. श्रद्धा मस्के आणि अँड्र्यू रॉबिन्सन या कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे.
अँड्र्यू अमेरिकेमध्ये पोलीस अमेरिकन तरुण अँड्र्यू रॉबिनसन हा तेथील पोलीस विभागात सायबर क्राईम या विभागात कार्यरत आहे तर त्याचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. अँड्र्यू यांची आई तेथील शाळेत शिक्षिका आहे. उच्च शिक्षित असलेल्या कुटुंबात दर्यापूरातील एक सामान्य कुटूंबातील मुलीने सून म्हणून प्रवेश केला. त्यामुळे ही गोष्ट दर्यापूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता, आता पुन्हा एकदा ते अमरावतीला आले आहेत.