JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar Student Food Poisoning : इडली खाताय तर सावधान! नगरमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीचा झाला मृत्यू, कारण आलं समोर

Ahmednagar Student Food Poisoning : इडली खाताय तर सावधान! नगरमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीचा झाला मृत्यू, कारण आलं समोर

बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 07 मार्च : अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या 12 वीचे पेपर सुरू असल्याने पालकांबरोबर विद्यार्थीही काळजी घेत असतात. मुलांच्या अभ्यासापासून ते खाण्यापीण्यापर्यंत पालक मुलांची काळजी घेत असतात. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली. परंतु उपचार सुरू असताना विद्यार्थीनीचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमधील लोणी गावात काल (दि.06) ही घटना घडली. मयत विद्यार्थीनीचे नाव तेजस्विनी मनोज दिघे असे असून ती शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगली होती. दरम्यान तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपुरेच राहिल्याने घरातील सर्वच हळहळ व्यक्त करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तिचे आजोबा यातून बचावले आहेत.

पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून बाप-लेकावर कोयत्याने वार, पुण्यातील हादरवणारी घटना

संबंधित बातम्या

यासंबंधी माहिती अशी की, लोणी येथील तेजस्वनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिची बारावीची परीक्षा सुरू होती. प्रवरानगर येथील केंद्रावर तिचा नंबर आला होता. विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते. गेल्या बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. त्या दिवशी सकाळी तिने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे यांनी रात्रीचे इडली-सांबर खाल्ले.

जाहिरात

तिचे आजोबा भीमराज दिघे हे रयत शिक्षण संस्थेमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. रात्रीचे शिळे अन्न खाणे त्यांना चांगलेच महागात पडले. काही वेळातच दोघांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोट दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. मात्र, नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटलला हलविण्यात आले.

जाहिरात

तेव्हापासून त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू होते. एका बाजूला मृत्यूशी लढाई सुरू होती तर दुसरीकडे बारावीचे उरलेले पेपर बुडत होते. अखेर तेजस्विनी जगण्याची लढाईही हरली. सोमवारी तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तिचे आजोबा मात्र बचावले आहेत.

जानेवारीत ओळख, नंतर प्रेम अन् लग्नाचे आमिष देत प्रेयसीसोबत भयानक कृत्य

तेजस्विनी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी तिने अभ्यासही केला होता. पहिले काही पेपर दिल्यानंतर तिच्यावर हे दुर्दैव ओढावले. त्यात तिचा मृत्यू झाला. तिचे आणि कुटुंबयांचेही स्वप्न भंगले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या