JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar News: शेतकरी नवरा केला तर मुलींना मिळणार बक्षीस, 'या' गावातील भन्नाट योजना, Video

Ahmednagar News: शेतकरी नवरा केला तर मुलींना मिळणार बक्षीस, 'या' गावातील भन्नाट योजना, Video

शेती करणाऱ्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच शेतकऱ्याशी लग्न करणाऱ्या मुलींला बक्षीस देत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 3 एप्रिल: बहुतांश मुलींची विवाहासाठी ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ अशीच भूमिका असते. मुली व त्यांच्या पालकांची विवाहासाठी नोकरदार किंवा उद्योजकांना पहिली पसंती असते. त्यामुळे शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न एक गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. अनेक मुलांचे विवाह तटले असून ‘नवरी मिळेना नवऱ्याला’ अशी अवस्था आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडीच्या सरपंचांनी स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिणी योजना सुरू केली आहे. या योजनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. काय आहे शेतकरी अर्धांगिणी योजना? सध्या मुली आणि त्यांचे पालक वर शोधताना शहर आणि नोकरदार वर्गालाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शेतकरी मुलांना वधू मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक युवा शेतकऱ्यांनी वयाची तिशी, पस्तिशी ओलांडली तरी त्यांचे लग्न होत नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील दरेवाडीचे सरपंच आनंदा दुर्गुडे यांनी गावात स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिणी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकरी नवरा करणाऱ्या मुलींना 5 हजारांचे बक्षीस आणि संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात येत आहे. त्यांच्या या योजनेचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

शेतकरी मुलांचा विवाह गंभीर समस्या सध्या शेतकरी मुलांचा विवाह एक गंभीर समस्या बनत आहे. त्याची कारणे बेभरवशाच्या शेती व्यवसायत आहेत. शेकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. बी-बियाणे, खतांचे भाव वाढले आहेत. तर शेतीमालाचे दर अस्थिर असतात. हमी भाव नसल्याने बऱ्याचदा कष्ट करून पिकवलेलं धान्य मातीमोल दरानं विकावं लागतं. तर कधी वादळ, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे पीक वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य राहत नाही. याचाच परिणाम म्हणून शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नोकरदारांना प्राधान्य कशासाठी? शेतकऱ्यापेक्षा नोकरदारांना विवाहासाठी पंसती देण्याची विविध कारणे आहेत. नोकरदारांना पगार निश्चित असतो. तर शेतकऱ्याचे उत्पन्न बेभरवशाचे असते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य असणाऱ्या नोकरी, व्यवसाय करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी प्राधान्य दिले जाते. शेतकरीही आपल्या मुली आर्थिक स्थैर्य असणाऱ्या नोकरदारांनाच देण्यास प्राधान्य देतो. शेतीची कामे कष्टाची असतात. तुलनेने नोकरीत शारीरिक कष्ट नाही. शहरातील जीवन खेड्यातील संघर्षापेक्षा सुखी असते असा एक समज समाजात आहे. अशा विविध कारणांमुळे मुलींना व पालकांना शेतकरी नवरा नको असतो. त्यातच विवाहयोग्य मुलींचे प्रमाणही कमी आहे. पीडित महिलांचा मोठा आधार, अन्यायग्रस्तांना ‘इथं’ मिळतो मोफत न्याय! पाहा Video शेतकऱ्यांच्या विवाहास प्रोत्साहन देण्याची गरज सध्या आधुनिक पद्धतीने शेती करून अनेक तरुण शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तसेच पशुपालन आणि इतर माध्यमातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. परंतु, शेती आणि शेतकऱ्यांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विवाहास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठीच सरपंच आनंदा दुर्गुडे यांनी शेतकरी अर्धांगिणी योजना सुरू केली आहे. तशाच योजना शासन स्तरावरही सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या