जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : पीडित महिलांचा मोठा आधार, अन्यायग्रस्तांना 'इथं' मिळतो मोफत न्याय! पाहा Video

Mumbai News : पीडित महिलांचा मोठा आधार, अन्यायग्रस्तांना 'इथं' मिळतो मोफत न्याय! पाहा Video

Mumbai News : पीडित महिलांचा मोठा आधार, अन्यायग्रस्तांना 'इथं' मिळतो मोफत न्याय! पाहा Video

Mumbai News : ही संघटना पीडित महिलांचा मोठा आधार आहे. या ठिकाणी अन्यायग्रस्तांना मोफत न्याय मिळतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 3 एप्रिल : कोरोनच्या काळात अनेकांचा व्यवसाय बुडाला कित्येक जणांना आपली नोकरी गमवावी लागली. यामुळे आर्थिक विवेचनेतून समाजात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या. असंख्य पीडितांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. अशा सर्वांना मुंबई तील ‘मेरे अधिकार मेरी जिम्मेदारी’ म्हणजेच मर्जी सामाजिक संघटनेने मदतीचा हात दिला आहे. संघटना पुढे आली आधुनिक काळातही महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. त्यासाठी भारत कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा आणण्यात आला परंतु अनेकांना त्याची जुजबी माहिती ही नाही. त्यामुळे अनेक प्रकरणात पीडित महिलांची तक्रार दाखल करून घेण्यापेक्षा तडजोड करून तिला सासरी पाठवण्यावर भर दिला जातो. अशा महिलांच्या मदतीला मर्जी संघटना पुढे आली आहे. संघटनेकडे आता पर्यंत 309 प्रकरणे आली आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    अशी मिळते मदत  कायद्यासंबंधात जनजागृती आणि नागरिकांना आपले अधिकार आणि देश व समाजाप्रती कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तीन वर्षांपासून संघटनेने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. विविध मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा, विधी साक्षरता कार्यशाळा आणि वस्तावस्त्यांमध्ये कायदेविषयी परिसंवाद आयोजित केला जातो. त्याशिवाय समाजातील अन्यायग्रस्तांना कायदेशीर मोफत चालले मदत समुपदेश संबंधित प्रशासनासोबत पत्र व्यवहार आणि पाठपुरवठा संघटनेकडून केला जातो वंचित उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांना संघटनेची मोठी मदत होते.

    Nagpur News: पहिली बेटी धनाची पेटी, कुटूंब नियोजन केल्यास मिळणार 50 हजार रुपये

    आमच्याकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये 90 टक्के महिलांची प्रकरण आहेत. हुंडा, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अशी प्रकरण आहेत. समाजात अनेकांना कायद्याविषयी माहिती नाही. त्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही कोणतीही राजकीय आणि आर्थिक पाठबळ नसताना तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे समाजातील उपेक्षित आणि वंचित सनदशीर मार्गाने न्याय मिळून देण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. आम्ही समाजातील प्रत्येक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी निशुल्क कायदेशीर सल्ला, मदत, समुपदेशन, संबंधित प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार आणि पाठपुरवठा करत असतो, असं संस्थापक आणि संघटना प्रमुख मंगेश सोनवणे यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , mumbai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात