JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar News: बापमाणूस! पेपर टाकून मुलींना शिकवलं, 2 डॉक्टर तर एकीला केलं वकील, Video

Ahmednagar News: बापमाणूस! पेपर टाकून मुलींना शिकवलं, 2 डॉक्टर तर एकीला केलं वकील, Video

अहमदनगरमधील पेहरकर कुटुंबीयांनी सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. घरची गरिबी असताना त्यांनी दोन मुलींना डॉक्टर तर एकीला वकिलीचं शिक्षण दिलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 20 मार्च: आपल्याकडे मुलगा ‘वंशाचा दिवा’ आणि मुलगी ‘परक्याचं धन’ मानलं जायचं. परंतु, अलीकडे सामाजिक सुधारणांचं लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं आहे. लोक मुलीला ‘घरची लक्ष्मी’ समजू लागले आहेत. असंच काहीसं उदाहरण अहमदनगरमधील नेवासा तालुक्यात आहे. भानस हिवरे येथील पेहरकर कुटुंबीयांना तीन मुली व एक मुलगा आहे. घरची गरिबी असतानाही त्यांनी दोन मुलींना डॉक्टर तर एकीला वकिलीचं शिक्षण दिलं आहे. आपल्या कृतीतून त्यांनी समाजापुढं एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य भानस हिवरे येथील पेहरकर कुटुंबियांची घरची परिस्थिती बेताची आहे. अशोक पेहरकर हे पेपर टाकण्याचे काम करतात. तर पत्नी रंजना पेहरकर या मोलमजुरी करतात. पेहरकर दाम्पत्याला तीन मुली व एक मुलगा आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य असताना पेहरकर दाम्पत्याने मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला.

दोन मुली डॉक्टर, एक मुलगी वकील पेहरकर यांनी मुलींना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य दिले. मुलीही हुशार आहेत. दोघींनी डॉक्टर तर एकीने वकिलीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्रुती पेहरकर हिने BHMS चे शिक्षण घेतले. त्यानंतर ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करत कुटुंबाला हातभार लावत आहे. तर दुसरी जान्हवी BHMS च्या शेवटच्या वर्षाला असून प्रॅक्टीसही करत आहे. छोटी मुलगी अस्मिता वकिलीचे (LLB) शिक्षण घेत आहे. MPSC Success Story: मुलीनं पांग फेडलं! कारखान्यातील मजुराची लेक झाली क्लास वन अधिकारी! Video सामाजिक आदर्श तीन मुली झाल्याने समाजातील काही लोकांकडून हेटाळणी केली जात होती. मात्र, आम्ही तिन्ही मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. घरची परिस्थिती बेताची असली तरी मोलमजुरी करून मुलींना शिकवले. मुलीही हुशार आहेत त्यांनी आपआपली क्षेत्रे निवडली. आता दोघी डॉक्टर झाल्या असून एक वकिलीचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे आता आमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे, असे पेहरकर सांगतात. पेहरकर दाम्पत्याने छपरात राहून मोलमजुरी केली पण मुलींना शिकवले. त्यामुळे त्यांची ही कृती समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करणारी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या