साईचरणी दान केली 27 लाखांची कार
सुनिल दवंगे, अहमदनगर 25 जुलै : ऑटो क्षेत्रातील नामांकित कंपनी महिंद्राकडून एक्स युव्ही 700 ही फुल ऑटोमेटिक कार साईचरणी दान करण्यात आली आहे. 27 लाखांची ही लक्झरी कार शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भेट देण्यात आली आहे. नवीन मॉडल बाजारात आलं की ते साईचरणी दान करण्याची महिंद्रा कंपनीची परंपरा आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ही कार साईचरणी दान करत आपली परंपरा सुरू ठेवली.
अत्याधुनिक सेवा सुविधा आणि पांढ-या रंगाच्या या कारची पुजा ऑटोकंपनीचे चिफ मॅनेजर नागरा यांच्या हस्ते करण्यात आली. तसंच या कारची चावी साई संस्थानला सुपुर्द करण्यात आली आहे. महिंद्रा कंपनीने आत्तापर्यंत 14 कार , दोन ट्रॅक्टर, एक दुचाकी अशी वाहने साई चरणी अर्पण केली आहेत.. देवा महाराष्ट्रावर रुसला का? इगतपुरीजवळ किल्ला धसला, घटनेचा LIVE VIDEO मंहिद्रा कंपनीची खासियत अशी आहे, की जे नवीन वाहन बाजारात ते लॉन्च करतात ते साईंच्या चरणी भेट देतात. महिंद्रा ग्रुपकडून उत्पादित होणारी पहिली चारचाकी, दुचाकी किंवा ट्रॅक्टरही दान स्वरूपात साईबाबा संस्थानला देण्यात येतं. याच परंपरेनुसार, हे 15 वे वाहन त्यांनी साईचरणी दान केलं आहे. ज्याची किंमत साधारण 27 लाख रुपये आहे.