JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रियकराने प्रेयसीला संपवले, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड, अहमदनगर हादरलं!

प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रियकराने प्रेयसीला संपवले, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड, अहमदनगर हादरलं!

प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रियकरानेच प्रेयसीसोबत भयानक कृत्य केले.

जाहिरात

अटक करण्यात आलेले आरोपी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरीश दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 22 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस भयानक घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या तसेच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. प्रियकर आणि प्रेयसीच्या वादातून खूनाच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका बेपत्ता असलेल्या मुलीचा प्रियकरानेच घातपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी हा प्राथमिक शाळेतील शिक्षक असून त्याने एका मुलीला फुस लावून पळवून नेले आणि साथीदारांच्या मदतीने तिचा खून केला. ही मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद राजुर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती. या मुलीला वासळी येथील दत्तु धोंडु डगळे याने आणि त्याचा साथीदार मनोहर पुनाजी कोरडे याने शहापुर तालुक्यातील साकुर्ली परिसरातील एका दगडाच्या खाणीमध्ये मुलीला मारुन फेकुन दिल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. हेही वाचा -  चारित्र्याचा संशय, पत्नीसह मुलगा आणि सासऱ्यालाही जाळले, गोंदियात आरतीसोबत घडलं भयानक या मुलीला नोकरीच्या नावाखाली गाडीत बसवुन आरोपींनी नेले होते. दरम्यान, यानंतर या मुलीची मिसिंगची तक्रार राजुर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती. राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी तांत्रिक तपास करुन नाशिक येथुन एका आरोपीला अटक केली. यानंतर प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पथकात राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोनि गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक ए जे शेख, दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटांगरे, विजय मुंडे, साईनाथ वर्पे, सुनिल ढाकणे, कैलास नेहे, रोहिणी वाडेकर यांचा समावेश होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या