JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar News: चीनची कन्या झाली नगरची सून, पाहा कशी जमली जोडी, Video

Ahmednagar News: चीनची कन्या झाली नगरची सून, पाहा कशी जमली जोडी, Video

चीनची कन्या यांग छांग हिनं अहमदनगरमधील योग शिक्षक राहुल हांडे याच्यासोबत विवाह केला. पाहा अनोखी प्रेमकहाणी..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 6 जुलै: तुम्ही काही वर्षांपूर्वी फॉरेनची पाटलीन हा चित्रपट पाहिला असेल ज्यामध्ये एका युवकाने विदेशी मुलीसोबत विवाह केला होता. असच काहीसं अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलंय. चीनची मुलगी भोजदरी सारख्या खेडेगावातील मुलाच्या प्रेमात पडली आणि दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हिंदू संस्कृतीनुसार या दोघांचा विवाह पार पडला. आता या अनोख्या लग्नाची आणि लव्हस्टोरीची सर्वत्र चर्चा आहे. चीनची कन्या झाली नगरची सून भोजदरी येथील राहुल हांडे हा योगाचं शिक्षण घेण्यासोबतच नोकरीसाठी चीनला गेला. योग शिकवत असतानाच तेथील मुलीशी त्याची मैत्री झाली. पुढे शान यान छांग सोबतच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी कायमचं एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि चीनमध्ये रजिस्टर मॅरेज करुन त्यांनी संगमनेर इथे पारंपरिक पद्धतीनं विवाह करण्याचा निर्णय घेतला. आता चीनची कन्या अहमदनगरची सून झाली असून त्यांचा अनोखा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे.

हिंदू संस्कृतीनुसार विवाह चीनमध्ये रजिस्टर लग्न केल्यानंतर राहुल शान यान छांग हिला घेऊन आपल्या गावी आला. पारंपारिक हिंदू पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत पुन्हा लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. हळदीपासून सर्व विधी पार पडताना शान यान अगदी भारावून गेली होती. राहूल जेव्हा तिला संगमनेरला घेऊन आला तेव्हा इथले वातावरण आणि निसर्ग बघून शानला खूप आनंद झाला. पारंपारिक लग्नात पार पडलेले विधी तिने कधी बघितले नव्हते. चीनमध्ये अगदी पंधरा मिनिटात लग्न पार पडते मात्र भारतात पाच दिवस लग्न विधी केले जातात. राहुलचा स्वभाव आवडला 2017 मध्ये मी राहुल जिथे जॉब करत होता तिथे कामानिमित्त जॉईन झाले होते. राहुल तिथे योगा शिकवत होता व तेथून आमचे संबंध वाढले व राहुलचा स्वभाव आवडल्यामुळे कालांतराने आम्ही माझ्या घरच्यांच्या संमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला, असं राहुलची पत्नी शान हिनं सांगितलं. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, आईनं मोलमजुरी करून दिलं शिक्षण, पीएसआय बनतं सुनीलनं साकारलं स्वप्न Video चीनची सून असल्याचा अभिमान जॉब निमित्ताने राहुल सहा वर्षांपूर्वी चीनला गेला होता तिथे सर्व काही अनोळखी होतं. मात्र योग शिकवत असताना शान राहुलची सहकारी म्हणून काम करत होती. कोरोना काळात त्यांनी चीनमध्ये राहुलची योग्य पद्धतीने काळजी घेतली. त्यामुळे राहुलला शानचा स्वभाव आवडण्यास सुरुवात झाली व त्याने आम्हाला कळवले की चीनमधील मुलीशी मला विवाह करायचा आहे. सुरुवातीला हे ऐकून आम्हाला थोड आश्चर्यच वाटलं की बाहेरच्या देशातील सून केल्यानंतर लोक काय म्हणतील. सुनबाईला इथली परिस्थिती सूट होईल का? मात्र सुनबाईंनी देखील इथली परंपरा संस्कृती माणसे लवकरच आपली करून घेतली. त्यामुळे आमच्या मुलाचे लग्न चीनच्या मुलीशी झालय व आम्हाला चीनची सुनबाई मिळाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया राहुलच्या आई-वडिलांची होती. राहुल - शान पुन्हा चीनला जाणार संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावात राहणारा राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या 8 वर्षांपासून योगाचे धडे देत आहे. आता लग्नविधी संपल्यानंतर राहूल पुन्हा चीनला रवाना होणार आहे. अजून काहीवर्ष चीनमध्ये योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा पुन्हा भारतात येण्याचा मानस आहे. मात्र एखाद्या ग्रामीण भागातील तरुणाने चक्क चीनच्या मुलीशी लग्न केले याचीच सर्वत्र चर्चा होतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या