अहमदनगर, 22 जुलै: अलीकडच्या काळात काही मुले आणि मुली वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. मात्र, त्यांची संपत्ती घेऊन त्यांना एकटे सोडून देताता. याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील नवलेवाडी ग्रामपंचायतीने क्रांतिकारी निर्णय घेतल आहे. जी मुले किंवा मुली आई- वडिलांना सांभाळतात त्यांनाच वडिलोपार्जित संपत्तीचे वारस म्हणून हक्क मिळतील, ठराव झाला आहे. असा क्रांतिकारी निर्णय घेणारी नवलेवाडी ही बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. नवलेवाडी ग्रामपंचायतचा क्रांतिकारी निर्णय अकोलेजवळील नवलेवाडी ग्रामपंचायतीत बुधवारी ग्रामसभा झाली. यामध्ये जी मुले आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत त्यांना त्यांच्या संपत्तीत वाटा मिळणार नाही, असा ठराव मांडण्यात आला. हा ठराव ग्रामसभेत टाळ्यांच्या गजरात एकमताने संमत झाला. या क्रांतिकारी ठरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच अन्य ग्रामपंचायतीपुढे नवलेवाडी गावाने आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामविकास विभागाला पाठवला ठराव नवलेवाडीचे सरपंच प्रा. विकास नवले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या सभेतील महत्त्वाचा ठराव राज्य शासनाच्या महसूल विभाग व ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. आजच्या ग्रामसभेत संमत झालेल्या ठरावानुसार महसूल विभागाला वारस ठरविताना ग्रामपंचायतीकडून संमती घेऊनच वारस प्रकरणे मंजूर करता येतील. शासकीय सुविधा अगर विविध योजनेचा लाभ आई-वडिलांना मिळेलच पण जी मुले आई-वडिलांना सांभाळत नसतील त्यांना कोणत्याही पार शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तर आई-वडिलांची जबाबदारी शासनाची जर लाभ दिला तर आई-वडिलांची सर्वस्वी जबाबदारी शासनाकडे राहील असा ठराव ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी मांडला. त्यास ॲड. आनंद नवले यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्वच नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावास आपला पाठिंबा दर्शविला. यापूर्वी सैन्य दलातील विविध जवानांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णयही नवलेवाडी ग्रामपंचायतने घेतलेला आहे. कोणतीही जुनी वस्तू मिळण्याचं ठिकाण, 90 वर्षांपासून नगरमध्ये भरतो हा बाजार PHOTOS म्हणून ग्रामसभेत ठराव आणला आई-वडिलांना न सांभाळता त्यांचीच वारस मुले-मुली आपल्या स्वतःच्या जीवनात मश्गुल असतात. विशेष म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग ते घेत असतात. पण आई-वडिलांना मात्र घरातून काढून देऊन म्हातारपणी त्यांच्या पालनपोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. आजारपणामध्येही आर्थिक जबाबदारी न घेता त्यांच्याशी आपलं जणू काही नातंच नाही, असं वागतात. त्यामुळे म्हातारपण हा शाप ठरला असून वृद्धावस्थेत आई-वडिलांना जगणे मुश्किल होते. त्यासाठीच ग्रामसभेत हा महत्वपूर्ण ठराव एकमताने संमत करण्यात आला, असे प्रा. नवले यांनी सांगितले. या ग्रामसभेस आरोग्य कर्मचारी, कृषी अधिकारी, वीज अधिकारी, तलाठी उपस्थित होते.