नेहाल भुरे, (भंडारा) : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतातील माल घेऊन जाणारा ट्रॅक्टरला ट्रकने साइड न दिल्याने ट्रॅक्टर सरळ पुलावरुन 30 फुट चुलबंद नदीत कोसळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे घडली आहे. ही घटना पवनी -लाखांदूर मार्गावरील शिव मंदीर जवळील पुलावर घड़ली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पवनी येथे ट्रकने ट्रॅक्टरला साईड न दिल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला आहे. यात ट्रॅक्टरवरील एक जागीच तर ठार दोघे गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये आण्णा पारधी (वय 50) असे मृतकाचे नाव आहे. तर राष्ट्रपाल ठाकरे (वय 50) राध्येश्याम ढोरे (वय 44) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
हे ही वाचा : पुण्यात नवले पुलावरून तरुणीची उडी; पोलीस मदतीला धावले पण…
लाखांदूर येथील शेतकरी राष्ट्रपाल ठाकरे यांनी आपल्या शेतातील कडधान्य बाजार समिती येथे नेण्याकरिता आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरून सहकारी आण्णा पारधी व राध्येश्याम ढोरे यांच्या सोबत ट्रॅक्टरवर निघाले होते. लाखांदूर-पवनी मार्गावरिल चुलबंद नदीवरील पुलावरुन समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने साइड दिली नाही.
यामध्ये ट्रॅक्टर चालकाने आपला बचाव करण्यासाठी साईडला घेताना ट्रॅक्टर सरळ 30 फुट पुलावरुन आदळला. यात आण्णा पारधी यांच्या जागीच मृत्यु झाला असून राष्ट्रपाल ठाकरे यांचा पाय मोडला आहे. राध्येश्याम ढोरे हे ही गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा : प्रेमविवाह केला, मुलीच्या घरच्यांना सहन झालं नाही, पुण्यात सैराटपेक्षा भयानक घडलं
अपघात होताच लोकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रैक्टरमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविन्यात आहे. दरम्यान जखमींवर उपचार सुरु आहेत. याबाबत घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु करण्यात आला आहे.