JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आबांची जादू आजही; आर.आर पाटील यांचं नाव घेतलं आणि 40 कोटी जास्त मिळाले

आबांची जादू आजही; आर.आर पाटील यांचं नाव घेतलं आणि 40 कोटी जास्त मिळाले

पुण्याच्या बैठकीतील एक खास माहिती सध्या चर्चेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 26 फेब्रुवारी : पुण्यात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हा नियोजन निधीसंदर्भात बैठक घेतली होती. सध्या या बैठकीतील किस्सा खूप चर्चिला जात आहे. या बैठकीत अजित पवार यांनी सांगली जिल्ह्याला 280 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र जिल्ह्याने 315 कोटींची मागणी केली होती. 280 कोटींचा निधी ऐकून आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, अधिकारी थोडे नाराज झाले होते. ही रक्कम जाहीर केल्यानंतर सर्वांचे चेहरे पडले होते. हे अजित पवारांनी ओळखलं होतं. त्यानंतर मात्र अजित पवार पुढे म्हणाले, आबांच्या जिल्ह्यावर मी अन्याय केला, असं व्हायला नको, म्हणून अजून 20 कोटी देत आहे. चला 300 कोटींना मंजुरी द्या, असं ते यावेळी म्हणाले. अजित पवारांनी आबांचं नाव घेताच, त्यांचे जिवलग मित्र आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्याकडे पाहत म्हणाले की, अजितदादा तुम्ही आबांचं नाव घेतलच आहे आणि वहिणीही येथेच आहेत. जिल्ह्याला 320 कोटींचा निधी मंजूर करावा, अशी आरआर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांची इच्छा आहे. यावर अजितदादांनी त्यांची मागणी मान्य केली व सांगली जिल्ह्याला 320 कोटी जाहीर केले. हे ही वाचा- ‘मराठी भाषा दिनासाठी सगळे नियम? संजय राठोडांसाठी नाही का?’; मनसे आक्रमक

संबंधित बातम्या

हे ही वाचा- भाजपमध्येही ‘पावरी’ होत आहे; जे.पी. नड्ड्यांचा #pawar Video तुफान व्हायरल काही दिवसांपूर्वी आर.आर.पाटील यांचे भाऊ राजाराम पाटील यांच्यासंदर्भातील एक वृत्त समोर आले होते. पोलीस दलातील अनेक अधिकारी आजही क्रिम पोस्टिंग मिळावी म्हणून मंत्र्यांच्या मागे लागलेले असतात. मात्र ज्यांचा स्वतःचा भाऊ बारा वर्षे राज्याचा गृहमंत्री असताना देखील वीस वर्षे साईड ब्रँचला काम केलं ते प्रामाणिक अधिकारी म्हणजे राजाराम पाटील असल्याच सांगत अजित पवारांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी राजाराम पाटील यांनी एक खुलासा केला. त्यांनी कधीच आबांना मतदान केलं नसल्याचं यावेळी सांगितलं. त्यामुळे अनेकांना त्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या