JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 29 वर, तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरूच

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 29 वर, तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरूच

इर्शाळवाडीमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

मृतांचा आकडा 29 वर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 22 जुलै : इर्शाळवाडीमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे. एनडीआरएफकडून ढिगारा बाजुला करण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात देखील वाढ होत आहे. आज मृतांचा आकडा 29 वर पोहोचला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा ते आकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावावर दरड कोसळली. या घटनेत गावातील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. या घटनेत आतापर्यंत 29 जणांनी आपला जीव गमावला आहे. अद्यापही काही जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

बचाव कार्याचा तिसरा दिवस   आज बचाव कार्याचा तिसरा दिवस आहे, सलग तीन दिवसांपासून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या चार टीम, एकूण 100 जवान, टीडीआरएफचे 80 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या 5 टीम तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदत करत आहेत. स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या