बुलढाण्यात भीषण अपघात
बुलडाणा 01 जुलै : बुलडाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यात बसमध्ये आग लागल्याने 25 प्रवासी जिवंत जळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस एका लग्नासाठी जात होती. तेव्हाच पावसामुळे बस रस्त्यावरुन घसरली. या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. घटनेच बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. टायर फुटून बसचा अपघात नाही, RTO ने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर हा अपघात (Buldhana Bus Accident) समृद्धी महामार्गावर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 1 वाजून 35 मिनिटांनी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही बस नागपूरहून पुण्याला जात असताना हा अपघात झाला. बस एका पोलला धडकली. जखमींना उपचारासाठी बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बसमधून आठ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.