JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

‘हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते’

जाहिरात

'हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा झाला, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिंदे गटाकडे गेलं आहे. उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. तर संजय राऊत यांनी ट्वीट करून खळबळजनक आरोप केला आहे.

‘माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत’, असा आरोप राऊतांनी केला आहे. ‘हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते’, असा इशाराही राऊतांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या