JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: लाखांदूरमधील महावितरणच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार; फरशी फोडताच दिसलं भयानक दृश्य

VIDEO: लाखांदूरमधील महावितरणच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार; फरशी फोडताच दिसलं भयानक दृश्य

अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जवळपास 10 साप आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कक्षात उघडकीस आली आहे

जाहिरात

वीज कार्यालयात आढळले चक्क 10 साप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेहाल भुरे, भंडारा 08 जुलै : भंडाऱ्यातून एक अजब घटना समोर आली आहे. वीज वितरण कार्यालय म्हणजेच नागरिकांना विजेविषयी विविध सोयीसुविधांसह मार्गदर्शन मिळण्याचं ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी चक्क अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जवळपास 10 साप आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कक्षात उघडकीस आली आहे. सर्पमित्रांनी दिवसभर शोध मोहीम राबवून कार्यालयातील फरशी फोडून जवळपास 10 सापांच्या पिल्लांना जिवंत पकडलं.

संबंधित बातम्या

शुक्रवारी सकाळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालय गाठून आपलं दैनंदिन कामकाज सुरू केलं. मात्र सकाळी लवकरच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला पाण्याच्या कॅन खाली एक साप आढळून आला. थोडा वेळ होत नाही तोच कार्यालयात काम करीत बसलेल्या एका कर्मचाऱ्याला फरशीवरून पुन्हा एक साप जाताना दिसून आला. दुसऱ्या खोलीतील अन्य कर्मचाऱ्यांना देखील असे साप दिसून आले. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नजीकच्या सर्पमित्रांना दिली. पावसाळ्यात सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये वाढ; घरात या वनस्पती लावल्यास साप आसपासही भटकणार नाहीत घटनेची माहिती मिळताच लाखांदूर येथील सर्पमित्र सुशील सिल आणि सहकारी मित्र पवन दिवठे यांनी तात्काळ लाखांदूर येथील वीज वितरण कार्यालय गाठलं आणि सापांचा शोध सुरू केला. सकाळपासून सापांचा शोध सुरू केला गेला. यावेळी अधिकारी कर्मचारी काम करीत असलेल्या खोल्यांमध्ये तब्बल 10 सापांची पिल्ले आढळून आली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिने सापांना पकडून बॉटलमध्ये कैद केलं. सर्पमित्राने चक्क अधिकारी कर्मचारी बसत असलेल्या खोलीचा भाग आणि फरशी फोडून सापांचा शोध घेतला. या शोध मोहिमेत जास्त नागाची पिल्ले आढळून आली आहेत. या घटनेनं कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या