रवी सपाटे/ 25 जुलै, गोंदिया : चोरीच्या घटना तर आपण नेहमीच ऐकतो. परंतू आता टोमॅटो चोरीला गेले अशी पोलिसात तक्रार आली आहे. गोंदिया शहरा किशोर धुवारे यांचं भाजी मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांच्या दुकानातून आरोपींनी तब्बल 10 किलो टोमॅटो, 5 किलो मिरची चोरून नेल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. आता टोमॅटो सुद्धा सेक्युरिटी मध्ये ठेवावे काय? असा प्रश्न भाजी विक्रेतांना पडलाय. याविषयी गोंदिया शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी तत्परता दाखवीत चैनलाल चिखलोंडे याला पांढराबोडी या गावात टोमॅटो आणि मिरचीची विक्री करीत असताना रंगेहात पकडले आणि या चोरीच्या दोन तासातच उलगडा लावला. त्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. टोमॅटोमुळे झाला लखपती… सध्या अनेक ठिकाणी टोमॅटोचे दर वाढल्याचे चित्र आहे. छत्तीसगडमध्ये 100 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने टोमॅटो मिळत आहे. यामुळे अनेक जणांनी टोमॅटो वापरण्याचे प्रमाण कमी केले आहे. तर पावसामुळे झालेले नुकसान आणि बाजाराक टोमॅटोची आवक कमी झाल्याने हे दर वाढले आहे. मात्र, अशा परिस्थितीत एक शेतकरी आहे, जो टोमॅटो विकून रोज लाखो रुपये कमावतो आहे. Video Viral : झेड प्लस सिक्योरिटी; आता तुम्ही टोमॅटो चोरुनच दाखवाच अरूण कुमार साहू असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अरूण कुमार साहू हे त्यांच्या 150 एकर शेतीतून दररोज 600 ते 700 कॅरेट टोमॅटो सप्लाय करत आहेत. या माध्यमातून त्यांना दररोज 10 लाख रुपये उत्पन्न मिळत आहेत. तसेच यातील नफ्याचा विचार केला तर सर्व खर्च काढून त्यांना 6 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळत आहे.