जयपूर, 20 एप्रिल : अलीकडच्या काळात सेलेब्रिटीप्रमाणेच काही सनदी अधिकारीदेखील सोशल मीडियावर (Social Media) कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. सेवा बजावताना केलेलं एखादं महत्त्वाचं काम असो वा खासगी जीवनातल्या घडामोडी काही सनदी अधिकारी नेहमीच अशा गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. 2015 मधल्या यूपीएससी टॉपर टीना डाबी (Tina Dabi) यादेखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. पहिल्या पतीपासून विभक्त झालेल्या टीना याचं वैवाहिक जीवन तर गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे. टीना डाबी बुधवारी (20 एप्रिल) आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे (IAS Officer Pradeep Gawande) यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. प्रदीप हे टीना यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. टीना याचं मन जिंकणाऱ्या प्रदीप यांची नेमकी पार्श्वभूमी कशी आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. प्रदीप यांची शैक्षणिक आणि आयएएस अधिकारी म्हणून कारकीर्द खूप मोठी आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे बुधवारी विवाहबद्ध झाले. राजस्थानची राजधानी जयपूर (Jaipur) येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. विवाहाच्या निमित्तानं 22 एप्रिलला एका ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रदीप गावंडे यांचं नुकतंच जयपूरमधील उच्च शिक्षण विभागात सहसचिव (Joint Secretary) म्हणून पोस्टिंग करण्यात आलं आहे. टीना या राजस्थान सरकारच्या वित्त विभागात सहसचिव या पदावर कार्यरत आहेत. टीना यांचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्यांचा विवाह आयएएस अधिकारी अतहर अमीर खान यांच्याशी झाला होता. परंतु, 2020 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला होता. राधे माँचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, काम मिळवण्यासाठी लपवायचा ओळख प्रदीप यांच्याविषयी बोलताना एका मुलाखतीत टीना यांनी सांगितलं, ``प्रदीप हे माझ्याप्रमाणेच एससी प्रवर्गातले आहेत. माझी आई आणि ते एकाच पोटजातीतील आहेत. माझ्या आईप्रमाणेच प्रदीप हेदेखील मराठी कुटुंबातले आहेत.`` टीना यांनी अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदीप यांच्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. एकदा तर टीना यांनी एक फोटो शेअर करताना `मला तुझ्या गालावरची खळी आवडते,` असं लिहिलं होतं. आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातल्या लातूरचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. 9 डिसेंबर 1980 रोजी त्यांचा जन्म झाला. ते एका सामान्य कुटुंबातले आहेत. सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर प्रदीप यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलं. त्यानंतर दिल्लीतल्या अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी आयएएस करण्याचा निर्णय घेतला. प्रदीप यांनी दिल्लीत राहून यूपीएससीची (UPSC) तयारी सुरु केली. 2013 मध्ये ते यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले. त्यांचे ऑल इंडिया रँकिंग 478 होते. याचा अर्थ या प्रोफेशनमध्ये ते टीना यांच्यापेक्षा तीन वर्षाने वरिष्ठ आहेत. प्रदीप यांना टीना यांच्याप्रमाणे राजस्थान केडर (Rajasthan cadre) मिळाले. त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावली. प्रदीप चुरूचे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर त्यांच्याकडे राजस्थान कौशल्य आणि उपजीविका विकास महामंडळाचे एमडी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाच्या संचालक पदावर करण्यात आली. लग्नापूर्वी एक आठवडा त्यांच्याकडे उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.