जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / राधे माँचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, काम मिळवण्यासाठी लपवायचा ओळख

राधे माँचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, काम मिळवण्यासाठी लपवायचा ओळख

Radhe Maa Son in movies

Radhe Maa Son in movies

वादग्रस्त राधे माँ उर्फ (Radhe Maa) सुखविंदर कौर यांचा मुलगा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मात्र, तो राधे माँचा मुलगा आहे, ही ओळख तो लपवायचा. गेल्या पाच वर्षांपासून हरजिंदर सिंग मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी धडपड करतोय. तो राधे माँचा सर्वांत मोठा मुलगा आहे. लवकरच तो रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ (Inspector Avinash) चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 19 एप्रिल: वादग्रस्त राधे माँ उर्फ (Radhe Maa) सुखविंदर कौर यांचा मुलगा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मात्र, तो राधे माँचा मुलगा आहे, ही ओळख तो लपवायचा. गेल्या पाच वर्षांपासून हरजिंदर सिंग मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी धडपड करतोय. तो राधे माँचा सर्वांत मोठा मुलगा आहे. लवकरच तो रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ (Inspector Avinash) चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हरजिंदर सांगतो की, त्याची आई इथं आल्यानंतर काही वर्षांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईत (Mumbai) शिफ्ट झालं. इथे आल्यावर तो अभिनयात करिअर करण्याचा विचार करू लागला. त्याची या इंडस्ट्रीत (Film Industry) ओळख नव्हती, शिवाय तो फिल्म इंडस्ट्रीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. लोक जसं सांगायचे तसं तो करत गेला. गेल्या पाच-सहा वर्षांपासून तो चित्रपटांसाठी ऑडिशन देतोय. एवढ्या संघर्षानंतर आता अखेर हरजिंदरला काही भूमिका मिळू लागल्या आहेत. ‘इन्स्पेक्टर अविनाश’नंतर तो दीपक तिजोरी दिग्दर्शित ‘टिप्सी’ चित्रपटात दिसणार आहे. त्याने आज तकशी बोलताना या संदर्भात माहिती दिली. Baby Bump फ्लाँट करत सोनम कपूरचं ग्लॅमरस फोटोशूट, Mom To Be चा फॅशनिस्टा अंदाज राधे माँसोबतचं नातं कसं आहे? राधे माँसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल हरजिंदर सांगतो, “मी तीन ते चार वर्षांचा होतो तेव्हा देवी माँ (राधे माँ) यांनी संसाराचा त्याग केला. माझ्या आजीने मला आणि लहान भावाला वाढवलं. वडील त्यावेळी परदेशात राहत होते. राधे माँसोबत माझं कधीच आई-मुलाचं नातं नव्हतं, याची खंत मला आयुष्यभर राहील. नेहमी मी त्यांना भक्ताप्रमाणे भेटत आलोय. एकाच घरात राहायचो; पण त्या बाहेरच्या एका खोलीत बसायच्या, तिथेच लोक त्यांना भेटून आशीर्वाद घेत असत. तेव्हा जास्त कळायचं नाही, त्यामुळे मी विचार करायचो नाही. कदाचित लहानपणापासून त्याच वातावरणाची सवय लागल्याने मी त्यात गढून गेलो.” रणदीप हुड्डासोबत काम करण्याचा अनुभव रणदीप हुड्डासोबत (Randeep Hudda) काम करण्याच्या अनुभवाबद्दल हरजिंदर म्हणाला, “ते म्हणजे खूप दिग्गज कलावंत आहेत. त्यांच्याशी बोललो नाही तरी त्यांचं काम बघून खूप शिकायला मिळतं. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे.” तसंच हरजिंदरने त्याच्या स्ट्रगलबद्दलही सांगितलं. उत्तराची वाट पाहण्यात वर्षं गेली हरजिंदर म्हणतो की, “मला इथे (बॉलिवूड) एक गोष्ट खूप विचित्र वाटते की इथे ऑडिशननंतर लोक तुम्हाला क्लॅरिटी देत नाहीत. ‘बघूया’, ‘काहीतरी करू’ आणि सांगतो, असं म्हटलं जातं. मला आधी वाटायचं की, कदाचित काही अपडेट्स मिळतील. पण हे सगळं सांगून वर्षानुवर्षे ते गायब व्हायचे. माझी कित्येक वर्षं उत्तराची वाट पाहत गेली.” मुलगा म्हणून रक्त खवळतं पण… राधे माँ या अतिशय वादग्रस्त संत आहेत. यावर हरजिंदर म्हणतो, की लोकांचं कामच बोलण्याचं आहे. देवी माँ बिग बॉसच्या घरात गेली तेव्हा ती स्पर्धक म्हणून गेली नव्हती, ती तिथे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गेली होती. आता लोकांनी त्याकडे कसं पाहिलं, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो, लोक त्यांना नावं ठेवतात. तुम्ही सर्वांशी वाद घालू शकत नाही. मुलगा म्हणून आईला कोणी काहीही बोललं तर रक्त खवळतं हे खरंय. पण मी कोणाकोणाशी लढायला जाऊ? माझ्या आईने कधीही कोणत्याही समाजाचं, व्यक्तीचं, जातीचं नुकसान केलं नाही, मग लोक तिच्याबद्दल प्रश्न का उपस्थित करतात. एखाद्या व्यक्तीला न भेटता मतं मांडणं, चुकीचं आहे,” असं हरजिंदर म्हणतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात