JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World Brain Tumour Day 2022: ब्रेन ट्यूमरची ही लक्षणं वेळीच ओळखणे आहे गरजेचे; धोका टाळता येतो

World Brain Tumour Day 2022: ब्रेन ट्यूमरची ही लक्षणं वेळीच ओळखणे आहे गरजेचे; धोका टाळता येतो

ब्रेन ट्यूमर काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यावर वेळीच उपचार करता येतील. आपल्या मेंदूमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात, यालाच ब्रेन ट्यूमर म्हणतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 जून : दरवर्षी आज 8 जून रोजी ‘जागतिक ब्रेन ट्यूमर डे’ (World Brain Tumour Day 2022) साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर समस्येबद्दल लोकांना माहिती व्हावी आणि त्याबाबत लोकांमध्ये जागरूकता यावी, जेणेकरून हा आजार रोखता येईल, हा यापाठीमागचा उद्देश आहे. ब्रेन ट्युमरची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जे लोक दीर्घकाळ रेडिएशनच्या संपर्कात असतात आणि जे लोक धूम्रपान करतात त्यांना ब्रेन ट्यूमर होण्याचा धोका जास्त असतो. यामुळेच लोकांना या आजाराच्या धोक्यांबद्दल सावध केले जाते. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून, रॅली काढून लोकांनामध्ये प्रबोधन केले जाते. जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचा इतिहास जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस 2000 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. याची सुरुवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशनने (German Brain Tumour Association) केली होती. ही संस्था ब्रेन ट्यूमरबद्दल लोकांना जागरुक करण्याचे काम करते, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या आजाराची लक्षणे माहित व्हावी आणि वेळेवर उपचार मिळू शकतील. ब्रेन ट्यूमर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आदर म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाचे महत्त्व - जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशनचे ध्येय ब्रेन ट्यूमरवर उपचार शोधणे आहे. असोसिएशन विशेषत: न्यूरो-ऑन्कोलॉजी क्षेत्रातील विज्ञान आणि संशोधनास समर्थन देते आणि आंतरराष्ट्रीय ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करते. “नॉलेज मेक्स द फ्युचर” या ब्रीदवाक्यासह, असोसिएशन ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांना आणि त्यांच्या काळजीवाहूंना मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करते. त्यांच्या वेबसाइट hirntumorhilfe.org द्वारे, जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन ब्रेन ट्यूमर निदान आणि उपचारांबद्दल नवीनतम माहिती प्रसारित करते आणि एक जर्नल देखील प्रकाशित करते. ते कॉन्फरन्स आयोजित करतात आणि टेलिफोनद्वारे इतर सेवा देखील देतात. ही संघटना ब्रेन ट्यूमरच्या उपचार आणि संशोधनामध्ये सहभागी असलेल्या गटांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देखील कार्य करते. हे वाचा -  20 ते 25 वर्षांच्या तरुणांनी आहारात घ्यावेत हे पदार्थ; राहाल दीर्घायुष्य निरोगी ब्रेन ट्यूमर म्हणजे काय आणि त्याची लक्षणे जाणून घ्या - ब्रेन ट्यूमर काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यावर वेळीच उपचार करता येतील. आपल्या मेंदूमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात, यालाच ब्रेन ट्यूमर म्हणतात. म्हणजेच, मेंदूच्या पेशी असामान्यपणे वाढतात तेव्हा एक ट्युमर तयार होतो. ब्रेन ट्यूमरची समस्या हलक्यात घेऊ नये, कारण काहीवेळा ही कर्करोगाची गाठ देखील असू शकते. त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. हे वाचा -  पिंपल्स, काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस आहे फायदेशीर; असा करा घरगुती उपाय - सतत डोकेदुखी - वारंवार मिर्गी झटके (recurrent epileptic seizures) - शरीरात अशक्तपणा जाणवणे - ताणतणाव - स्मृती भ्रंश - वागण्यात चिडचिड - ऐकण्यास कठीण - वारंवार येणारा ताप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या