JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर...; हर्ष गोयंका यांचा VIDEO होतोय व्हायरल

लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर...; हर्ष गोयंका यांचा VIDEO होतोय व्हायरल

हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ (Viral video) अवघ्या 30 सेकंदाचा आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घातला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : सध्या सर्वत्र कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते. कोरोना लशीचे काही दुष्परिणामही समोर येते आहेत. दरम्यान याच कालावधीत कोरोना लशीशी (Covid 19 vaccine) संबंधित अनेक मजेशीर व्हिडीओदेखील व्हायरल (Viral video) होत आहेत. बिझनेसमॅन हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनीदेखील असाच एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होतो आहे. हर्ष गोयंका यांनी दोन महिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका स्टेजवर या दोन्ही महिला गात आहेत. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. हसून हसून पोट दुखेल आणि हसता हसता रडालदेखील. असं या व्हिडीओ नेमकं आहे तर काय ते तुम्हीच पाहा.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता दोन महिला कलाकार स्टेजवर गात आहेत. दोघी एकत्र बसून गात आहे. गाताना दोघांमधील जोषदेखील पाहण्याचा आहे. इतक्या जोषात ते गातात की जणू काही त्यांना कशाशीच शुद्ध राहिली नाही. हर्ष गोएंका यांनी हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्याला तसंच मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर… असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. हे वाचा -  अरे हे काय? मृतावस्थेत असलेलं हरण चक्क पळू लागलं; शिकारीचा VIDEO होतोय व्हायरल लशीचा असा परिणाम प्रत्येकाला आवडला आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लशीचे दुष्परिणाम, भांग का नशा जोगिरा सा रा रा अशा कमेंट नेटिझन्सनी यावर दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या