JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shani Dev: म्हणून अनेकांवर शनिदेवाची पडते वक्रदृष्टी; अशा गोष्टी लागोपाठ घडत जातात

Shani Dev: म्हणून अनेकांवर शनिदेवाची पडते वक्रदृष्टी; अशा गोष्टी लागोपाठ घडत जातात

अनेकजण जाणूनबुजून किंवा नकळत अशी काही कामे करतात, ज्यामुळे त्यांच्यावर शनिदेवाची वक्र दृष्टी पडू लागते. त्या व्यक्तीच्या चुकीच्या कर्मांमुळे आणि वागण्यामुळे शनिदेव क्रोधित होतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै : आज शनिवारी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. आज शनिदेवाची पूजा केल्याने साडेसाती किंवा शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते. अनेकजण जाणूनबुजून किंवा नकळत अशी काही कामे करतात, ज्यामुळे त्यांच्यावर शनिदेवाची वक्र दृष्टी पडू लागते. त्या व्यक्तीच्या चुकीच्या कर्मांमुळे आणि वागण्यामुळे शनिदेव क्रोधित होतात. शनिदेवाची आपल्यावर वक्रदृष्टी आहे की नाही हे कसे ओळखावे, असा प्रश्न काहींना पडू शकतो. पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांनी शनीची वक्रदृष्टी असल्यास कोणत्या गोष्टी दिसतात, याबाबत सांगितले आहे. शनिदेव आपल्यावर नाराज झाल्याची लक्षणे - 1. जेव्हा तुमच्या प्रत्येक कामात विघ्न येत असेल तर 2. जेव्हा आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खोटे बोलू लागतो. 3. आपले आरोग्य बिघडू लागते. 4. न्यायालयीन प्रकरणांमध्ये किंवा वादविवादात आपण अडकू लागतो. 5. मनात नेहमी अस्वस्थता आणि तणाव असणे. 6. अचानक धनहानी होणे शनिदेव कशामुळे क्रोधित होतात - 1. जेव्हा आपण दारू, जुगार इत्यादी वाईट व्यसनांना बळी पडतो. 2. आपण इतरांबद्दल कपट, कपटाची भावना मनात ठेवत असल्यास. हे वाचा -  पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार 3. शनिदेव इतरांचा द्वेष आणि चोरी केल्याने देखील नाराज होतात. 4. सफाई कर्मचारी, सेवक किंवा आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्यास. 5. आई-वडील आणि वडीलधाऱ्या लोकांचा अनादर करणे. 6. अचानक धनहानी होते. 7. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा हक्क किंवा वाटा हिसकावून घेता. 8. आजारी आणि असहाय लोकांना गरज असताना मदत न करणे. हे वाचा -  Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम 9. जे आपले घर घाण ठेवतात. साफसफाई वेळेत करत नाहीत. 10. शनिदेव प्राण्यांवर विशेषतः कुत्र्यांना मारणाऱ्या आणि त्रास देणाऱ्यांवरही नाराज असतात. 11. जे व्यभिचारी आहेत. स्त्रियांबद्दल चुकीचा दृष्टीकोन ठेवा. 12. देवदेवतांचा अपमान करणाऱ्यांवरही शनिदेवांचा कोप होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या