JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मोदी सरकारला 150 रुपयांना मिळणारी Covishield सामान्यांसाठी 400-600 रुपये का? आदर पूनावालांनी सांगितलं कारण

मोदी सरकारला 150 रुपयांना मिळणारी Covishield सामान्यांसाठी 400-600 रुपये का? आदर पूनावालांनी सांगितलं कारण

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum institute of india) कोविशिल्ड (Covishield) या कोरोना लशीची किंमत (Covishield price) वाढवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 21 एप्रिल : आतापर्यंत लस उत्पादक कंपन्या केंद्राला कोरोना लस (Corona vaccine) देत होत्या आणि केंद्रामार्फत राज्यांना कोरोना लशीचा (Covid 19 vaccine) पुरवठा केला जात होता. पण आता केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांना थेट राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना लस पुरवण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी लस उत्पादक कंपन्यांना एक किंमत (Corona vaccine price) ठरवण्यास सांगण्यात आली. त्यानुसार पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum institute of india) आपल्या कोविशिल्ड (Covishield) या कोरोना लशीची किंमत (Covishield price)  400 ते 600 रुपये ठरवली आहे. मोदी सरकारला जी लस 150 रुपयांना दिली जाते ती सर्वसामान्यांसाठी इतकी महाग का दिली जाते आहे? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. केंद्र सरकारने लस बाजारात आणण्याची परवानगी देताच पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लशीची किंमत वाढवली. राज्य सरकारला कोरोना लशीचा एक डोस 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना दिला जाणार आहे. किंमत वाढवण्यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत CNBC TV18 ने सीरमचे सीईओ आदर पूनावाला (Adar poonawalla) यांच्याशी संवाद साधला. आदर पूनावाला यांनी सांगितलं, “सर्वात आधी आपण कोरोना लशीची किंमत 1000 रुपये ठरवली होती. तीसुद्धा जास्त नव्हती. पण तरी आम्ही 150 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काही राज्यांकडून 1000 रुपये कोरोना लशीसाठी प्रस्तावही आला. त्यांनी आम्हाला अनुदानही देऊ केलं. पण आम्ही ते नाकारलं कारण आम्हाला केंद्र सरकारकडून तशी परवानगी नाही. कोरोना लशीची किंमत ठरवण्याआधी आम्ही काही राज्य सरकारशी बोललो. आम्ही 600 रुपये किंमत ठरवली होती. पण राज्यांशी बोलल्यानंतर राज्य सरकारसाठी 400 रुपये किंमत केली” हे वाचा -  जगात सर्वात स्वस्त भारताची Covishield कोरोना लस; Serum ने जारी केली किंमत पूनावाला पुढे म्हणाले, “150 रुपये किमतीने कोरोना लस देऊन खरंतर आम्ही तोट्यात आहोत.  या लशीबाबत अॅस्ट्राझेनेका कंपनीशी करार केलेला असल्याने आम्हाला त्यांना नफ्याचा 50% भाग द्यावा लागतो. केंद्र सरकारला आम्ही आधीच 9 ते 10 कोटी डोस दिले आहेत. दुसऱ्या करारानुसार आम्ही 110 दशलक्ष डोस देणार आहोत. हे डोससुद्धा 150 रुपये किमतीनुसारच देणार आहोत. कारण नव्या कोरोना लसीकरण मोहिमेआधी हा करार झाला आहे” “दुसरं म्हणजे किंमत वाढवण्याचं आणखी एक कारण म्हणजे जास्तीत जास्त परदेशी लस उत्पादकांना भारताकडे आकर्षित करणं. भारतात आता अनेक लशी उपलब्ध होतील आणि ही आताची गरज आहे”, असंही पूनावाला यांनी सांगितलं. हे वाचा -  COVAXIN चा शेवटच्य चाचणीचा निकाल जारी; 18+ लोकांच्या लसीकरणाआधी मोठी माहिती समोर आता सर्व सरकारसाठी कोरोना लशीची किंमत 400 रुपयेच आहे. सुरुवातीला आम्ही केंद्र सरकारसोबत करार केला त्यानुसार कोरोना लशीची किंमत 150 रुपये होती. आता कोरोना लशीचा नवा टप्पा सुरू होणार आहे. त्यावेळी केंद्र सरकारसाठी ही किंमत 400 रुपयेच असेल. इतकी किंमत असली तरी आम्ही जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस देत आहोत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या