मुंबई, 21 एप्रिल : 1 मेपासून देशातील सर्वात मोठा कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) टप्पा सुरू होणार आहे. त्याआधी मेड इन इंडिया कोरोना लस (Corona vaccine) कोवॅक्सिनबाबत (COVAXIN) मोठी माहिती समोर येत आहे. भारत बायोटेकने (Bharat Biotech) या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये लस किती प्रभावी आहे हे सांगण्यात आलं आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन ही कोरोना लस. या लशीचा सरासरी प्रभाव हा 78% आहे. गंभीर कोरोनावर ही लस 100% प्रभावी आहे. यामुळे कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. लक्षण नसलेल्या रुग्णांसाठी ही लस 70% टक्के प्रभावी आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा वेगही मंदावू शकतो. तर आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार ही लस डबल म्युटंट कोरोनाविरोधातही प्रभावी आहे. हे वाचा - जगात सर्वात स्वस्त भारताची Covishield कोरोना लस; Serum ने जारी केली किंमत देशातील लसीकरण मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी भारत बायोटेक पुढच्या महिन्यात म्हणजेच मेमध्ये कोव्हॅक्सिनच्या तीन कोटी डोसची निर्मिती करणार आहे. भारत बायोटेकचे (Bharat Biotech) प्रमुख कृष्णा एल्ला (Krishna Ella) यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. मार्च महिन्यात कंपनीनं लसीच्या 1.5 डोसचं उत्पादन केलं होतं. एल्ला यांनी सांगितलं, की वर्षाला ते लशीच्या 70 कोटी डोसची निर्मिती करणार आहेत. हे वाचा - लस घेताच आपण सुरक्षित होतो का? Vaccine कंपनीच्या प्रमुखांनी दिली प्रतिक्रिया कमीत कमी वेळात सर्व भारतीयांचं लसीकरण करता यावं यासाठी पंतप्रधानांनी लशीचं उत्पादन वाढवण्याचं आवाहन कंपन्यांना केलं होतं. यानंतर एल्ला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मागील महिन्यात आम्ही दीड कोटी लशीच्या डोसचं उत्पादन केलं होतं. यावेळी आम्ही दोन कोटी डोसची निर्मिती करणार आहोत, असंही एल्ला म्हणाले. तर, त्याच्या पुढच्या महिन्यात तीन कोटी डोसची निर्मिती केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर उत्पादनात सातत्यानं वाढ केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.