JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आई झाल्यानंतर तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी विसरायला लागलात? पाहा काय आहे 'मॉमी ब्रेन' प्रॉब्लेम

आई झाल्यानंतर तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी विसरायला लागलात? पाहा काय आहे 'मॉमी ब्रेन' प्रॉब्लेम

अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, मुलाला जन्म दिल्यानंतर आईच्या मेंदूवरही त्याचा काहीसा परिणाम होतो. कधीकधी त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, आई होण्यामुळे स्त्रीच्या स्मरणशक्तीवरही कायमस्वरूपी परिणाम होतो.

जाहिरात

काय आहे 'मॉमी ब्रेन' समस्या?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : आई झाल्यानंतर महिलांची तक्रार असते की, त्या छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागतात. काही महिलांच्या ही गोष्ट लक्षात येते किंवा काही महिला याकडे दुर्लक्ष करतात. तुमच्यासोबत असं घडलय का? की तुम्ही घाईगडबडीत खोलीत गेलात आणि खोलीत का आलात हे विसरलात किंवा गाडीची चावी हातात आहे आणि तुम्ही संपूर्ण फ्लॅटमध्ये चावी शोधत राहिलात? जर तुम्ही अशा समस्यांनी त्रस्त असाल तर ही समस्या तुमच्या एकट्याची नाही. वास्तविक या समस्येला ‘मॉमी ब्रेन’ प्रॉब्लेम म्हणतात. व्हेरीवेलफॅमिलीच्या मते, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, बाळाच्या जन्मानंतर आईच्या मेंदूवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि काहीवेळा त्याचा प्रभाव बराच काळ टिकून राहतो. ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, आई होण्याचा स्त्रीच्या स्मरणशक्तीवर कायमचा परिणाम होतो.

प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीनंतर गॉलब्लॅडरची समस्या सामान्य आहे का? जाणून घ्या

संबंधित बातम्या

या समस्येचे कारण काय आहे? बऱ्याच संशोधकांचा असा विश्वास आहे की, हे बदल नवीन आईसाठी तिच्या बाळाची काळजी घेण्याची क्षमता वाढवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हे असेही म्हणता येईल की, मेंदूतील हे बदल खरेतर नवीन मातांना बाळाशी जुळवून घेण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहेत.

‘मॉमी ब्रेन’ प्रॉब्लेमवर मात कशी करावी? संयम ठेवा : शरीरातील या जैविक बदलामुळे तुम्ही स्वतःवर नाराज आहात आणि चिडचिड कराल. मात्र जर तुम्ही थोडा संयम ठेवला आणि कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी थोडे अतिरिक्त नियोजन केले तर तुम्ही या समस्या टाळू शकता. यादी बनवा : ही समस्या टाळण्यासाठी तुमच्या सर्व कामांची यादी बनवणे चांगले. यासाठी एक वही सोबत ठेवा आणि जेव्हा तुम्हाला काही आठवेल तेव्हा ते लिहून ठेवा. असे केल्याने तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी विसरणार नाही. प्लॅन करा : गोष्टींचा आराखडा आधीपासून बनवा आणि प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी ठेवण्याची सवय लावा. यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी डॉक्टरकडे जात असाल तर रात्री सर्व गोष्टी तयार ठेवा. तुमच्या चाव्या, पाकीट इत्यादी नेहमी त्याच ठिकाणी ठेवा. पुरेशी झोप आवश्यक आहे : नवीन माता दिवसाचे 24 तास व्यस्त असतात. पण तुम्हाला तुमची दिनचर्या अशा प्रकारे पाळावी लागेल की, तुमची झोप पूर्ण होईल. यासाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊ शकता आणि बाळासोबत झोपणे आणि उठणे ही दिनचर्या पाळू शकता. पुरेशी झोप घेतल्याने तुमच्या मेंदूला आराम मिळेल आणि तो अधिक चांगले कार्य करू शकेल. गरोदरपणात आयर्न कॅप्सूल घेतल्याने खरंच बाळाच्या रंगावर परिणाम होतो का? वाचा तज्ज्ञांचं मत मेंदूची अतिरिक्त काळजी घ्या : मेंदूसाठी आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि मेंदूचे खेळ खेळा. हे खेळ तुमचे ब्रेन सक्रिय ठेवण्यासाठी कार्य करेल आणि ते अधिक चांगले कार्य करण्यास सक्षम असेल. याशिवाय ज्या पदार्थांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात आणि प्रोटीन भरपूर असतात अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या