मुंबई, 02 जून : अनेकजणांना झोपेत दात चावण्याची सवय असते. आपल्या कुटुंबातील कोणाला दात चावण्याची सवय असेल तर काळजी घ्या. भीती वाटणे किंवा वाईट स्वप्न पडल्याने झोपेत दात चावले जात असावेत, असा अनेकांचा समज आहे. मात्र, वैद्यकीय भाषेत या सवयीला ब्रुक्सिझम (Bruxism) म्हणतात. ही सवय वाढली तर तो आजार होतो. झोपेत दात चावणे हे काही कॉमन नाही, म्हणून या आजारावर वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. हा आजार प्रामुख्याने मुलांमध्ये दिसून येतो. हा एक प्रकारचा झोपेचा विकार आहे. तज्ज्ञांच्या मते, दात चावण्याची सवय कायम राहिल्यास दात लवकर खराब होतात. ब्रुक्सिझम म्हणजे काय आणि हा आजार आपल्यासाठी कसा त्रासदायक ठरू शकतो, याबाबत जाणून घेऊया. लोक दात का चावतात WebMD च्या माहितीनुसार, दात चावण्याची अनेक कारणे असू शकतात. भीती, चिंता, थकवा किंवा ब्रुक्सिझम. ब्रुक्सिझम हा एक आजार आहे ज्याचे निदान करणे कठीण आहे. अनेकदा मुलांना झोपेत वाईट स्वप्न पडतात, त्यामुळे ते झोपेत दात चावू लागतात. त्याचबरोबर ज्या लोकांना झोपेशी संबंधित आजार आहेत, त्यांनाही अनेकदा दात चावण्याची सवय लागते, त्यामुळे हा आजार कोणत्याही एका कारणामुळे झाला आहे असे म्हणता येत नाही. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार ब्रुक्सिझम हानिकारक का आहे? झोपेत बडबडणे, चालणे आणि दात चावणे या गोष्टी तशा कॉमन असल्या तरी त्याचे अनेक तोटेही दिसून आले आहेत. ब्रुक्सिझममध्ये लोकांना दात चावण्याची सवय असते, त्यामुळे दातांची झीझ पण होते. असे सतत केल्याने दात किडू लागतात आणि वाकडे-तिकडे होऊ शकतात. लहान मुलांचे दात कमकुवत असतात, त्यामुळे दात पडण्याचीही भीती असते. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)