नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) आणि त्यांची पत्नी पायल नाथ (Payal nath) यांच्यात वैवाहिक विवाद सुरू आहे. पत्नीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी ओमर अब्दुल्ला यांनी 2016 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर बराच काळ यावर सुनावणी झाली नाही. अलीकडेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही घटस्फोटासाठी उशीर झाला आहे. आता ओमर अब्दुल्ला यांच्या पत्नी पायल नाथ यांच्या वकिलाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची परवानगी नाकारल्याने या प्रकरणाची सुनावणी आणखी लांबली आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांनी बायकोपासून घटस्फोट मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने एप्रिल 2020 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला ओमर अब्दुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायलयाने गुरुवारी सहमती दिली आहे. यावर, मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. असं असलं तरी ओमर अब्दुल्ला यांच्या या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. योग्य वेळी यावर सुनावणी होईल, असंही न्यायालायाने सांगितलं आहे. अब्दुल्ला यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, याप्रकरणी पायल नाथ यांचा पक्ष अंतिम सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी संमती देत नाही. तर दुसरीकडे अब्दुल्ला यांचा पक्ष सुनावणीसाठी हजर झाला आहे. ही वाचा - Love Story : या ‘ड्रीम कपल’मधलं प्रेमच संपून गेलं यावेळी खंडपीठाने वकिल कपिल सिब्बल यांना सांगितलं की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी परवानगी देण्यासाठी आपण कोणावरही दबाब आणू शकत नाही. असं म्हणतं न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी दोन आठवड्यानंतरची तारीख दिली आहे. गेल्यावर्षी 26 एप्रिल 2020 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने एक आदेश जारी केला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी दोन्ही बाजुंची परवानगी आवश्यक आहे. न्यायालयाच्या या आदेशाला ओमर अब्दुल्लांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. कोण आहेत पायल नाथ? जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी पायल नाथ यांचा प्रेमविवाह झाला होता. पायल नाथ सध्या दिल्लीत राहत असून त्या मुळच्या पाकिस्तानातील लाहोर येथील आहेत. हे वाचा - ऐकावं ते नवलच! म्हणे, ‘हवेनं मला प्रेग्नंट केलं आणि 15 मिनिटांत हलला पाळणा’ पायल नाथ यांचे वडिल मेजर जनरल रन नाथ हे लष्करातील मोठे अधिकारी होते. उमर अब्दुल्ला आणि पायल नाथ दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करताना दोघांची ओळख झाली आणि प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर दोघांनी 1994 साली प्रेमविवाह केला. या जोडप्याला सध्या दोन मुलं असून ते दोघंही दिल्लीत शिक्षण घेत आहेत. लग्न झाल्यानंतर 27 वर्ष एकत्र राहिल्यानंतर हे जोडपं आता विभक्त होण्याच्या मार्गावर आहे.