जकार्ता, 18 फेब्रुवारी : महाभारतात दुर्वासा ऋषींनी कुंतीला दिलेल्या मंत्रामुळे पाच पांडवांचा जन्म कसा झाला हे आपणा सर्वांना माहितीच आहे. या पाच पांडवांपैकी एक म्हणजे वायुदेवापासून झालेला पुत्र भीम. पण सध्याच्या युगात प्रत्यक्षात असं काही शक्य नाही आणि असं कुणी सांगितलं तरी विश्वास बसणार नाही. पण इंडोनेशियातील एका महिलेनं हवेमुळे आपण प्रेग्नंट झालो, असाच विचित्र दावा केला आहे. सध्या या विचित्र प्रेग्नन्सीची चर्चाच सर्वत्र सुरू आहे. एखाद्या महिलेला प्रेग्नंट होण्यासाठी तिचे पुरुषासोबत शरीरसंबंध येणं गरजेचं असतं किंवा नव्या तंत्रज्ञानानुसार आयव्हीएफमार्फत ती महिला प्रेग्नंट होऊ शकते. पण पश्चिम जाव्हाच्या (West Java) सिआनजूरमधील (Cianjur) 25 वर्षांची सिती जैनाह (Siti Zainah) हिनं आपण लैंगिक संबंधांमुळे नाही तर हवेमुळे प्रेग्नंट झाल्याचं सांगितलं. हे सर्वकाही फक्त एका तासातच झाल्याचं ती म्हणाली. रिपोर्टनुसार बुधवारी दुपारी तिनं प्रार्थना केली आणि त्यानंतर ती आराम करायला आपल्या खोलीत गेली. जैनाहनं सांगितलं, तेव्हा मला अचानक जाणवलं की व्हजायनामधून हवा माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. खोलीत हवा येऊन गेल्यानंतर 15 मिनिटांनी माझ्या पोटात दुखायला लागलं. त्यानंतर माझं पोट मोठं होऊ लागलं आणि मग मी जवळच्या क्लिनिकमध्ये गेली. तिनं मी एका मुलीला जन्म दिला. हे वाचा - ‘या’ गोड चिमुकलीच्या फोटोत दडलंय काही तरी वेगळंच; वाचून व्हाल थक्क डॉक्टरांनी सांगितलं आई आणि मूल दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. पण तिच्या प्रेग्नन्सीबाबत ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आहे. तज्ज्ञांच्या मते, कदाचित ही महिला प्रेग्नंट असावी पण जोपर्यंत तिला प्रसूती वेदना झाल्या नाहीत तोपर्यंत तिला याची माहितीच झाली नसावी. जैनाहला तिच्या आधीच्या पतीपासून एक मूल आहे. गेल्या चार वर्षांपासून ते दोघंही वेगळे राहतात. तिच्या या विचित्र प्रेग्नन्सीची आणि प्रसूतीची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रशासनापर्यंत पोहोचली. हे वाचा - Poop Transplant मुळे आयुष्य वाढणार; कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार विचित्र उपचार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. तिच्या आधीच्या नवऱ्याचाही शोध सुरू आहे. जेणेकरून खरं काय आहे, ते समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.