JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / देशात झपाट्याने वाढताहेत डायबिटिक किडनी डिजीजची प्रकरणं, ही आहेत लक्षणं

देशात झपाट्याने वाढताहेत डायबिटिक किडनी डिजीजची प्रकरणं, ही आहेत लक्षणं

मधुमेहामुळे किडनीवरही परिणाम होतो. मधुमेही रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचा आजार विकसित होतो. म्हणूनच मधुमेहावर उपचार वेळेवर सुरू होणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तो नियंत्रित करता येईल.

जाहिरात

डाबिटिक किडनी डिजीज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : मधुमेह हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. हा एक असा आजार आहे ज्यामुळे आपली जीवनशैली पूर्णपणे बदलते. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास इतर आजार होण्याचा धोकाही झपाट्याने वाढतो. मधुमेहा मुळे किडनीवरही परिणाम होतो. मधुमेही रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचा आजार विकसित होतो. म्हणूनच मधुमेहावर उपचार वेळेवर सुरू होणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तो नियंत्रित करता येईल. ओन्ली माय हेल्थच्या बातमीनुसार, टाइप 1 मधुमेहामुळे सामान्यतः किडनीला खूप नुकसान होते आणि त्याची सुरुवात मधुमेह झाल्यानंतर पाच वर्षानी सुरू होते. यावर वेळीच योग्य उपाययोजना केल्यास किडनीचे रक्षण करता येते. मात्र त्यासाठी जीवनशैली आणि नियमांचे काटेकोर पालन करावे लागते.

ड्राय फ्रुट मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

संबंधित बातम्या

मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे कसे होते नुकसान हाय ब्लड शुगर म्हणजेच मधुमेहामुळे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्या खराब होतात. जेव्हा रक्तवाहिन्या कमकुवत होतात किंवा खराब होतात तेव्हा किडणी योग्यरित्या काम करणे थांबवते. याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर होतो. मधुमेहामुळे हाय ब्लड प्रेशरची शक्यताही अनेक पटींनी वाढते. हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेहाच्या मिश्रणामुळे मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते.

डायबिटिक किडनी डिजीजचे रिस्क फैक्टर्स डायबिटिक किडनी डिजीजसाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात. यात लठ्ठपणा, धूम्रपान, हाय ब्लड प्रेशर, खारट पदार्थांचे अधिक सेवन, हृदयविकार असणे, मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास आणि अनियंत्रित रक्तदाब हे या आजारासाठी कारणीभूत असलेले रिस्क फॅक्टर्स आहेत. डाबिटिक किडनी डिजीजची लक्षणे मधुमेह हा असा आजार आहे ज्याची लक्षणे सामान्यतः दिसत नाहीत. याची माहिती फक्त रक्त तपासणीद्वारेच मिळू शकते. डाबिटिक किडनी डिजीजची लक्षणे देखील 80 टक्क्यांपर्यंत किडनी खराब होईपर्यंत आढळून येत नाहीत. काहीवेळा ते लघवीतील अल्ब्युमिनच्या गळतीमुळे लक्षात येते. चाचणी आणि उपचारात विलंब झाल्यास ही लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात. इतर लक्षणांमध्ये लवकर थकवा येणे, रात्री नेहमीपेक्षा जास्त लघवी येणे, भूक न लागणे, कठीण काम करताना त्रास होणे, धाप लागणे, स्नायू दुखणे, पिवळी लघवी यांचा समावेश होतो. तज्ज्ञांच्या मते, अनेक वेळा डायबेटिक किडनीच्या आजाराची लक्षणे डोळ्याभोवतीही दिसू लागतात. मधुमेहाचा आजार वाढत असताना डोळ्यांना सूज येऊ लागते. असे झाल्यास लक्षात येते की मूत्रपिंडावर देखील परिणाम होत आहे. डायबिटीज किडनी डिजीज कसा टाळावा डायबिटीज किडनी डिजीज टाळण्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवा आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू देऊ नका. तसेच कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रित ठेवा. सकस आहार घ्या आणि तणावापासून दूर राहा. याशिवाय नियमित मधुमेहाची तपासणी करून घ्या आणि वजनावर नियंत्रण ठेवा. गोड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. Diabetes Tips : डायबिटीजमुळे पायांमध्ये होतात वेदना, या सवयीमध्ये आत्ताच करा बदल (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या