JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त Green tea कशाला, वजन कमी करण्यासाठी आता प्या Green coffee; कशी बनवायची पाहा

फक्त Green tea कशाला, वजन कमी करण्यासाठी आता प्या Green coffee; कशी बनवायची पाहा

सामान्यपणे वजन कमी करायचं म्हटलं की बरेच लोक ग्रीन टी पिताना दिसतात. पण ग्रीन कॉफीबाबत तुम्हाला माहिती नसेल.

जाहिरात

वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23, ऑगस्ट : सध्याच्या काळात अनियोजित जीवनशैली आणि अनियमित आहार यामुळे अनेकांना वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वजन वाढले की शरीराचा आकार बिघतो आणि त्यामुळे अनेकाचा आत्मविश्वास देखील कमी होतो. त्यामुळे वजन वाढत असल्यास सावध राहणे गरजेचे असते. लठ्ठपणा हा आजार नसला तरी त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेहासारखे आजार जडू शकतात. हे सर्व टाळायचे असेल तर निरोगी आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. निरोगी पदार्थ खाण्यास सुरुवात केल्यास तुम्हाला पोट आणि कंबरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीसह अनेक हर्बल टी पिऊ शकता. परंतु ग्रीन कॉफीचाही आहारात समावेश करू शकता. ब्रोकोलीपासून बनवली जाणारी ही ग्रीन कॉफी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तुमचे वजन वाढत असेल किवा तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ही ग्रीन कॉफी तुमच्यासाटी वाढते वजन कमी करण्यास खूप उपयोगी ठरते. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार या पेयाची संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनने (CSIRO) दिली होती. जे लोक पुरेशा प्रमाणात भाज्या खात नाही किंवा खाऊ शकत नाही अशा लोकांसाठी ब्रोकोली पावडर हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

फिल्टर वॉटर की उकळलेले पाणी? निरोगी आरोग्यासाठी काय जास्त उपयोगी

असे कमी होते वजन तज्ज्ञांनुसार ब्रोकोली कॉफी वजन कमी करण्यात खूप मदत करू शकते. कारण ते एक कमी कॅलरी असलेले पेय आहे आणि त्यातून शरीराला भरपूर प्रमाणात फायबर देखील मिळते. ब्रोकोलीमध्ये वजन कमी करण्यासाठी अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे ब्रोकोलीपासून बनवलेलील ग्रीन कॉफी प्यायल्याने बराच वेळ भूक लागत नाही. पर्यायाने तुमच्या पोटात अन्न कमी जाते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय ब्रोकोली कॉफीमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स घटक असतात. हे घटक चरबी वितळवून वजन कमी करण्यास मदत करतात.

Control Cholesterol : नैसर्गिकरित्या नियंत्रित राहील कोलेस्टेरॉल लेव्हल, फक्त फॉलो करा या 6 टिप्स

संबंधित बातम्या

अशी तयार करा कॉफी ब्रोकोलीपासून कॉफी बनवण्यासाठी आधी ब्रोकोलीचे छोटे छोटे तुकडे करून काही दिवस उन्हात वाळवा. चांगले वाळल्यानंतर ते बारीक करून घ्या आणि त्याची पावडर बनवा. ही पावडर एका डब्यात भरून ठेवा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बाजारातून देखील ब्रोकोली पावडर विकत घेऊ शकता. कॉफी बनवण्यासाठी आधी गॅसवर दूध गरम करा आणि गरम दुधात ब्रोकोली पावडर घालून ग्रीन कॉफीचा आनंद घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या