मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Control Cholesterol : नैसर्गिकरित्या नियंत्रित राहील कोलेस्टेरॉल लेव्हल, फक्त फॉलो करा या 6 टिप्स

Control Cholesterol : नैसर्गिकरित्या नियंत्रित राहील कोलेस्टेरॉल लेव्हल, फक्त फॉलो करा या 6 टिप्स

कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे. परंतु वाढलेले कोलेस्ट्रॉल स्ट्रोक आणि किडनी निकामी होण्याचे कारण बनते. अशा परिस्थितीत नियमित व्यायाम आणि सकस आहाराने यावर नियंत्रण ठेवता येते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 20 ऑगस्ट : कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, जे हार्मोन्स बनवणे आणि सेल भिंती लवचिक ठेवण्यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये मदत करते. त्याचबरोबर शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकाराचा झटका, किडनी निकामी होणे आणि पॅरालिसिस यांसारख्या मोठ्या समस्यांचा धोका वाढू शकतो. ही समस्या अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे किंवा काही वेळा अनुवांशिक कारणांमुळे उद्भवू शकते. कोलेस्टेरॉल शरीरात लिपोप्रोटीनसोबत फिरते. एलडीएल कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्ताभिसरण रोखून आरोग्याला हानी पोहोचवू शकते. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी एचडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे काही नैसर्गिक मार्ग. नियमित व्यायाम हेल्थलाइनच्या मते, व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होते. हलका व्यायामदेखील हृदयाचे आरोग्य सुधारू शकतो आणि कोलेस्टेरॉलच्या जोखमीपासून आपले संरक्षण करू शकतो.

Mushroom Veg Or Non-Veg : मशरूम व्हेज आहे की नॉनव्हेज? हे आहेत मशरूम खाण्याचे फायदे आणि तोटे

सोल्युबल फायबरचे सेवन बीन्स, मटार, मसूर, फळे आणि इतर संपूर्ण धान्य हे विरघळणाऱ्या फायबरचे चांगले स्रोत आहेत. त्यांचे सेवन केल्याने प्रोबायोटिक गट बॅक्टेरियाचे पोषण होते जे शरीरातून एलडीएल कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करतात. मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचे सेवन ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑइल, ट्री नट्स आणि अव्होकाडो सारख्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, तसेच एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवता येते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राखता येते. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचे सेवन सर्व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स हेल्दी असले तरी, ओमेगा -3 ही अशी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आहे जी हृदयाचे आरोग्यदेखील मजबूत करते. ज्यामुळे संपूर्ण शरीर निरोगी होते. निरोगी वजन वजन कमी करणे म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणे. वजन कमी केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते आणि एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. ग्रीन टी उपयोगी असली तरी कितीवेळा पिणं आहे फायदेशीर; दुष्परिणाम पण समजून घ्या ट्रान्स फॅटपासून दूर राहा ट्रान्स फॅट आपल्या शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉल वाढवते, तसेच एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी खराब होते आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Tips for heart attack

पुढील बातम्या