नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : नवं वर्ष आलं की आपण जसं वार्षिक राशिभविष्य पाहतो तसं शेतकऱ्याला ओढ लागते ती हवामानाची कारण त्याचं पीक आणि पर्यायाने जगणंच पावसावर अवलंबून असतं. सरकारी हवामान विभागाप्रमाणेच सध्या खासगी हवामान कंपन्या आपला वार्षिक अंदाज व्यक्त करतात. अशीच एक खासगी हवामान अंदाज वर्तवणारी कंपनी स्कायमेट वेदरनं (Skymet Weather) 2021 मध्ये नैऋत्य मॉन्सून (Monsoon) सामान्य असेल असा अंदाज वर्तवला आहे. 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षांत नैऋत्य मान्सूनमुळे अंदाजापेक्षा अधिक पाऊस झाला होता. कंपनीनं आपल्या हवामान अंदाजाच्या पत्रकात म्हटलंय की, सध्या प्रशांत महासागर थंड असून ला नीना परिस्थिती उच्च आहे. ला नीना हा प्रशांत महासागराच्या थंड राहण्याशी संबंधित असून त्याचा परिणाम भारतीय मॉन्सूनवर होत असतो. समुद्राच्या पृष्ठभागावरचं तापमान वाढलं तर लवकरच ला नीना चं प्रमाण कमी होत जाईल. मान्सून येईपर्यंत हे प्रमाण जवळजवळ 50 टक्क्यांवर येईल. या वर्षी सामान्य मान्सून असेल. सुरुवातीला कमी प्रमाणात आणि पूर्ण मान्सून काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं या अंदाजात म्हटलं आहे. हे वाचा - Gold burger नंतर आता Gold biryani; रॉयल बिर्याणीची किंमत वाचूनच शॉक व्हाल स्कायमेटच्या अंदाजानुसार एक फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस झाला. मध्य तामिळनाडूत थोडा पाऊस झाला. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि सिक्कीम या भागांत खूप दाट धुकं पसरलं होतं. हे वाचा - ना युक्ती ना शक्ती; तरी मगरीच्या तावडीतून वाचला झेब्रा; कसं ते तुम्हीच पाहा स्कायमेट वेदरच्या टीमने देशभरातील हवामानाच्या परिस्थितीचा 2 फेब्रुवारीचा अंदाज सांगितला. त्यानुसार जम्मू-काश्मीरच्या जवळ एक दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामागून आणखी एक पट्टा येत आहे. हा दाबाचा पट्टा सध्या अफगाणिस्तान आणि त्याला लागून असलेल्या उत्तर पाकिस्तानाच्या परिसरात पोहोचला आहे. त्यामुळे मध्य पाकिस्तानातील भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. आग्नेय अरबी समुद्रापासून कर्नाटकच्या किनारपट्टीपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ रेषा तयार झाली आहे.