जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ना लढवली युक्ती ना वापरली शक्ती; तरी मगरीच्या तावडीतून वाचला झेब्रा; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO

ना लढवली युक्ती ना वापरली शक्ती; तरी मगरीच्या तावडीतून वाचला झेब्रा; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO

ना लढवली युक्ती ना वापरली शक्ती; तरी मगरीच्या तावडीतून वाचला झेब्रा; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO

मगर (crocodile) शिकार करतानाचे थराराक व्हिडीओ तुम्ही बरेच पाहिले असतील पण मगरीची फजिती कशी होते हे तुम्ही कधी पाहिलं आहे का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 फेब्रुवारी : आपला जीव वाचवण्यासाठी एक तर शक्ती वापरावी लागते किंवा युक्ती लढवावी लागते. पण या दोन्ही गोष्टींचा वापर न करता एका झेब्र्यानं (zebra) आपला जीव वाचवला आहे. मगरीची (crocodile)  शिकार होता होतो तो राहिला आणि याचं कारण म्हणजे एकतर त्या झेब्र्याचं नशीब आणि दुसरं म्हणजे परफेक्ट टायमिंग. मगर आणि झेब्र्याचा हा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे. मगर पाण्यात इतक्या सावधपणे आणि हुशारीनं शिकार करते की समोरच्यालाही तो शिकार होणार आहे, हे माहिती पडत नाही. त्याला समजण्याच्या आधीच मगर त्याच्यावर हल्ला करते. कधी कधी तर त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी धडपडही करता येत नाही. अवघ्या काही वेळातच मगर त्यांना संपवून टाकते. अगदी वाघ, बिबट्या असे प्राणीही याला अपवाद ठरत नाही. पण एका झेब्र्याचा जीव कसा वाचला ते तुम्हीच पाहा.

जाहिरात

एका ट्विटर युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहू शकता एक झेब्रा पाण्याच्या किनाऱ्यावर नाही तर पाण्यात उतरला आहे आणि त्याच पाण्यात मगर दबा धरून बसली आहे. संधी साधून ती झेब्र्यावर हल्ला चढवण्याच्या तयारीत होती. तीच संधी आली. झेब्रा पाण्यातून बाहेर पडू लागतो. तशी मगर त्याच्या मागे मागे जाते आणि त्याला आपल्या जबड्यात घेण्यासाठी जबडा उघडते. झेब्रा पूर्णपणे पाण्याचा बाहेर जातो. मगर त्याचा पाय आपल्या जबड्यात घेण्याचा प्रयत्न करते पण झेब्रा काही तिच्या तावडीत येत नाही. तो मगरीपासून काही अंतर दूर जातो. हे वाचा -  पक्ष्यावर धरला नेम पण शिकारीच झाला जखमी; नेमकं काय घडलं पाहा VIDEO एकाच वारात आपला शिकार पकडणाऱ्या मगरीला कदाचित पहिल्यांदाच अशी हार मानली लागली असावी. तसा झेब्रा तिच्यापासून जास्त दूर नाही पण तरी ती पाण्याबाहेर पडत नाही. कदाचित तिला आपलं हे आपली अशी हार झालेली सहन झालं नाही आणि म्हणून ती पुन्हा पाण्यात गेली. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. खूप जणांना हा व्हिडीओ पाहून मजा येते आहे. कारण मगरीची अशी फजिती कधीच पाहिली नसावी.  लकी झेब्रा आणि अनलकी मगर अशाच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर उमटत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात