JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भारीच! कोणत्याही स्मार्टकार्डची गरज नाही; फक्त रिकामी कॅन टाकून मशीनमधून मिळतात पैसे

भारीच! कोणत्याही स्मार्टकार्डची गरज नाही; फक्त रिकामी कॅन टाकून मशीनमधून मिळतात पैसे

ज्या वस्तूची काहीच किंमत नाही म्हणजे जी वस्तू आपण वापरत नाही, फेकून देतो अशी वस्तू एखाद्या मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याच्या बदल्यात त्या मशीनमधून आपल्याला पैसे मिळाले तर… असं फक्त स्वप्नातच होऊ शकतं, असं तुम्हाला वाटेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जानेवारी :  एटीएममध्ये (ATM) कार्ड (card) टाकल्यानंतर पैसे मिळतात, वेंडिंग मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर सामान मिळतं… आपल्यासाठी हे नवं नाही. पण ज्या वस्तूची काहीच किंमत नाही म्हणजे जी वस्तू आपण वापरत नाही अशी वस्तू एखाद्या मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याच्या बदल्यात त्या मशीनमधून आपल्याला पैसे मिळाले तर… असं फक्त स्वप्नातच होऊ शकतं, असं तुम्हाला वाटेल. मात्र एका व्यक्तीनं ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कोणतंही स्मार्टकार्ड न टाकता. फक्त रिकामी कॅन टाकून पैसे देणारी ही मशीन. Ross Creations नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर या मशीनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या हातातील रिकामा कॅन त्या मशीनमध्ये टाकते आणि त्या बदल्यात त्याला पैसे मिळतात.

संबंधित बातम्या

नवभारत टाइम्स च्या वृत्तानुसार या व्यक्तीनं एक साधं वेंडिंग मशीन खरेदी केलं. त्याला रिवायर केलं. म्हणजे त्यात थोडे बदल केले. भरलेले किंवा रिकामी कॅन त्यानं या मशीनमध्ये टाकले आणि त्या बदल्यात मशीनमधून त्याला डॉलर्स मिळाले. हे वाचा -  OMG! काठी समजून चिमुकल्यानं हातात घेतला जिवंत साप, पुढे काय झालं पाहा VIDEO स्वच्छता राखणं हे मशीन तयार करण्यामागील उद्दिष्ट आहे. लोक रिकामे कॅन असेच रस्त्यावर फेकतात. ज्यामुळे रस्त्यावर कचरा होतो. शिवाय हे कॅन रिसायकल होऊ शकतात. त्यामुळे या मशीनमध्ये हे कॅन टाकल्यानं त्याचा दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे ते रस्त्यावर फेकले जात नाही त्यामुळे कचरा होत नाही, स्वच्छता राहते आणि दुसरं म्हणजे त्या कॅनचा पुन्हा वापर होता आणि त्यामुळे त्या बदल्यात पैसे मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या