वॉशिंग्टन, 05 जानेवारी : अनेकवेळा खेळता खेळता लहान मुलं धडपडतात किंवा काहीही हातात घेतात. बऱ्याचदा विषारी प्राण्यांना देखील हात लावतात किंवा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. असाच एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. एका लहान मुलानं काठी समजून जिवंत सापाला उचललं आहे. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार आपण या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की चिमुकला आणि श्वान काठीने खेळत आहेत. चिमुकला काठी फेकतो आणि श्वान तो घेऊन येतो. अशाच पद्धतीनं खेळत असताना श्वान सापाला पाहून घाबरतो आणि दूर पळतो तर चिमुकला काठी उचलून श्वानाला फेकण्यासाठी म्हणून उचलतो पण ती काठी नसते तर जिवंत साप तो उचलतो हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
Heart-stopping moment toddler picks up a snake thinking it's a stick pic.twitter.com/MhIRybDH1e
— The Sun (@TheSun) January 3, 2021
या चिमुकल्याची आणि त्याच्या कुटुंबियांची ओळख अद्याप कळू शकली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वडिलांनी ही गोष्ट पाहिली आणि तातडीनं मुलाकडे धाव घेत त्याच्या हातातून हा साप दूर फेकून दिला. या सापाबद्दल देखील कोणतीही अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं हा संदेश मात्र या व्हिडीओमधून मिळतो आहे. आपल्या मुलांना एकटं सोडू नये आणि त्यांच्यासोबत राहावं असं आवाहन देखील कऱण्यात आलं आहे.

)







