JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी झाले IAS

ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी झाले IAS

आयआयटी कानपूरमध्ये (IIT Kanpur) इंजिनिअरिंग करत असताना अरूणराज यांनी यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) देण्याचा निर्णय घेतला. दोन्हींचा एकत्र अभ्यास करणं खरंच आव्हानात्मक होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जुलै : आयएएस ऑफिसर अरुणराज (IAS Officer Arunraj) उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. लहानपणापासुनच ते अतिशय हुशार होते. त्यांना दहावीमध्ये 94 % तर बारावी मध्ये 91 % मिळाले होते. त्यावेळी त्यांनी JEE परीक्षा पास करून IIT कानपूरमध्ये (IIT Kanpur) ऍडमिशन मिळवलं. इंजिनियरिंग (Engineering) केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) देण्याचा निर्णय घेतला ग्रॅज्युएशन करत असताना चौथ्या वर्षापासून त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली इंजिनिअरिंग आणि UPSC  दोन्ही एकत्र करणं फार कठीण होतं. त्यामुळे अरुणराज यांनी दोन्ही अभ्यासासाठी वेळ ठरवून घेतली. अभ्यासाला वेळ देता यावा म्हणून त्यांनी नोकरी केली नाही. ( चेहऱ्यावर निळे डाग येणं म्हणजे धोक्याची घंटा; दुर्लक्ष करू नका ) अरुणराज यांनी अभ्यासासाठी कोणत्याही कोचिंग क्लासचं मार्गदर्शन घेतले नाही. त्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास केला. याशिवाय ऑप्शनाल सब्जेक्ट म्हणून अ‍ॅथ्रोपोलॉजी निवडला होता. ( पावसाळ्यात मुलांना निरोगी ठेवायचंय? तर करून पाहा या 4 सोप्या गोष्टी ) केवळ 22व्या वर्षी त्यांनी UPSC  परीक्षा पास केली होती. UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अरुणराज यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हवं. अरुणराज सांगतात की, सातत्याने अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कमी वेळ अभ्यास केला तरी मन लावून अभ्यास करायला हवा. ( IAS ऑफिसर रोमा श्रीवास्तव यांचा अभ्यासाचा फंडा; युट्युब आणि इंटरनेटवरून केली परी ) अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर थोडा थोडा वेळ घेतल्यामुळे आपलं मन ताजतवानं होतं आणि अभ्यासात लक्ष लागतं याशिवाय जास्त पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा रिव्हिजन आणि मॉक टेस्ट आणि रायटिंग प्रॅक्टिसवर भर देण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे. अरुणराज यांनी 2014 साली UPSCची परीक्षा पहिल्यांदा दिली आणि 34 रँक मिळवंत  IAS ऑफिसर झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या