प्रतिकात्मक फोटो
मुंबई 2 ऑक्टोबर : आपल्या देशात चहाप्रेमींची कमी नाही. अनेकांना तर काहीही झालं तरी वेळेवर चहा मात्र लागतोच. तसेच असे काही लोक आहेत, ज्यांचा चहा जरी चुकला तरी देखील त्यांचा दिवस चांगला जात नाही. अनेक लोक तर आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. पण चहा पिणाऱ्यांमध्ये दोन प्रकार आहेत. काहींना चहा फक्त पिण्यासाठी आवडतो, तर काही लोकांना चहासोबत काही तरी खाण्यासाठी आवडतं. अनेक लोकांना अशी सवय असते की, ते चहासोबत ब्रेड, फरसाण आणि बिस्किटे खातात. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत ब्रेड खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं? अनेक लोक याला चांगला नाष्टा समजतात. कारण तो झटपट बनतो आणि त्याने पोट देखील भरलेलं राहातं. परंतू चहासोबत ब्रेड खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांनी तुम्ही घेरले जाऊ शकतात, हे विसरु नका. चहासोबत ब्रेड खाल्ल्याने आरोग्याला नक्की काय आणि कसं नुकसान होऊ शकतं? जाणून घेऊ या. हे वाचा : वाचाल तर वाचाल अन् नवीन शिकाल, ज्ञान संपन्नही व्हाल; जाणून घ्या वाचनाचे काय आहेत फायदे वजन वाढणे ब्रेड हे मैद्याच्या पिठापासून बनवल्या जातात. शिवाय, त्यात घातक रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्यांना पचवणे कठीण जाते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या तर वाढतातच, पण यामुळे वजन देखील वाढते. त्यामुळे जर तुम्हालाही चहासोबत ब्रेड खाण्याची आवड असेल तर आजच तुमची सवय बदला. रक्तातील साखर वाढते चहा आणि ब्रेडचे सेवन मधुमेहींसाठी खूप हानिकारक आहे. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. ज्यामुळे अशा लोकांनी चहासोबत ब्रेडचे सेवन कधीही करु नये. उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी समस्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये बीपीची पातळी वाढू शकते. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांना चुकूनही चहासोबत ब्रेड खाऊ नये. हे वाचा : नोकरीबरोबरच सहज करता येतील हे व्यवसाय; महिन्याला भरपूर रक्कम कमवण्याची संधी पोटात अल्सर होऊ शकतो जर तुम्ही सकाळी ब्रेडसोबत चहाचे सेवन केले, तर त्यामुळे पोटाचा अल्सर होऊ शकतो, कारण चहाचे सेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या उद्भवते. (विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)