JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर कधीही बघायच्या नसतात या गोष्टी; सगळा दिवस जातो खराब

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर कधीही बघायच्या नसतात या गोष्टी; सगळा दिवस जातो खराब

वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्या तर संपूर्ण दिवस खराब जातो. प्रत्येक कामात अपयश येते. तसेच कष्ट करूनही फळ मिळत नाही आणि केले जाणारे कामही बिघडू लागते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मे : बरेचदा काहीजण असे म्हणतात की, सकाळी उठल्यावर आज कोणाचा चेहरा बघितला होता माहीत नाही, संपूर्ण दिवस खराब गेला. सकाळी उठल्याबरोबर देवाचे दर्शन घ्यावे असे यासाठी म्हटले जाते, त्यामुळे त्या व्यक्तीचा दिवस चांगला जावा आणि दिवसभरातील सर्व कामांमध्ये यश मिळावे. पण अनेक वेळा माणूस सकाळी उठून आपल्या कामात व्यग्र होतो आणि देवाला नतमस्तक व्हायलाही (Vastu Tips For Morning) विसरतो. झीन्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्या तर संपूर्ण दिवस खराब जातो. प्रत्येक कामात अपयश येते. तसेच कष्ट करूनही फळ मिळत नाही आणि केले जाणारे कामही बिघडू लागते. आज जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर माणसाने कोणत्या गोष्टी पाहणे टाळावे, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. सकाळी उठल्यानंतर या गोष्टी पाहू नका आरसा - सकाळी जागे झाल्याबरोबर आरशाकडे पाहणे टाळावे, असे वास्तुतज्ज्ञांचे मत आहे. असे मानले जाते की सकाळी व्यक्तीच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा असते, जी चेहऱ्याद्वारे बाहेर पडते. परंतु जर एखाद्या व्यक्तीने आरशात पाहिले तर ते बाहेर जाणारी नकारात्मकता परत आत प्रवेश करते. म्हणून, सकाळी उठून सर्वप्रथम चेहरा धुवा, मगच आरशात पहा. अस्वच्छ भांडी - वास्तूनुसार रात्री किचनमध्ये घाण भांडी ठेवू नयेत. असे केल्याने घरात दारिद्र्य येते. दुसरीकडे, जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घाण भांडी साफ करण्यास सुरुवात केली तर शरीरातील सकारात्मक उर्जेचा प्रवाह कमी होतो. तसेच देवी लक्ष्मीही क्रोधित होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील भांडी आणि स्वयंपाकघर दोन्ही गोष्टी स्वच्छ करून झोपा. हे वाचा -  Betel nut: घरात नांदेल सुख-शांती-समृद्धी; पुजेवेळी सुपारीचा करा असा उपयोग बंद घड्याळ पाहणे - घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घराच्या भिंतींवर कधीही बंद घड्याळ लावू नका. सकाळी उठल्यानंतर बंद घड्याळ दिसले तर याचा अर्थ असा की तुमची वाईट वेळ सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळी बंद घड्याळाकडे पाहणे टाळावे. महत्त्वाचे म्हणजे घड्याळ बंद राहणार नाही, याची काळजी घ्यावी. हे वाचा -  व्वा! नोकरीसोबत ‘छोकरा-छोकरी’ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते सॅलरी आक्रमक पक्ष्यांचा फोटो वास्तूनुसार घरामध्ये आक्रमक प्राणी आणि पक्ष्यांची छायाचित्रे लावणे वर्ज्य आहे. पण तरीही, जर कोणी तशी लावली असतील तर सकाळी ही चित्रे पाहणे टाळावे. सकाळी अशी आक्रमक चित्रे पाहून दिवसभर आपण कोणत्या ना कोणत्या वादातच राहतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या