JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गर्भाशय निरोगी राहण्यासाठी हे पदार्थ नियमित आहारात घ्या, प्रसूती होते सुलभ

गर्भाशय निरोगी राहण्यासाठी हे पदार्थ नियमित आहारात घ्या, प्रसूती होते सुलभ

गर्भधारणेच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर गर्भाशय महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे गर्भाशयाला निरोगी ठेवणे, त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. गर्भाशय निरोगी राहण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : गर्भाशय हा कोणत्याही स्त्रीच्या शरीराचा महत्त्वाचा भाग असतो. गर्भधारणेच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर गर्भाशय महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे गर्भाशयाला निरोगी ठेवणे, त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. याशिवाय, जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेचे प्लॅनिंग करते तेव्हा तिला गर्भाशयाला हेल्दी राखण्याचा सल्ला दिला जातो. जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर गर्भधारणेमध्ये समस्या येऊ शकते. गर्भाशयात प्रॉब्लेम असल्यास गर्भपात होण्याची भीती राहते. हे टाळण्यासाठी फायबर, पोषक आणि व्हिटॅमिन सी भरपूर असलेले असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. गर्भाशयाच्या आरोग्याच्या बळकटीसाठी कोणते पदार्थ खावेत याबद्दल आज जाणून घेऊया. सुका मेवा, ड्रायफ्रुट्स - बदाम, काजू आणि अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रुट्स आणि फ्लॅक्ससीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते. गर्भाशयाशी निगडीत कोणत्याही प्रकारचा धोका कमी करण्यास त्यामुळे मदत होते. यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि बियांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. अधिकाधिक हिरव्या पालेभाज्यांचा नियमित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. हे गर्भाशयाला मजबूत करू शकते.

ताजी फळे - फळांमध्ये बायोफ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात. गर्भाशयात फायब्रॉइड वाढण्यापासून रोखते. त्यामुळे दररोज फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे गर्भाशय मजबूत होते. हे वाचा -  जेवताना घडणाऱ्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; भविष्यात येऊ शकतात अडचणी लिंबू - व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. लिंबू सेवन केल्याने गर्भाशयात संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, दररोज कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पिणे गर्भाशयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. फायबर आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असे पदार्थ आहारात घेणे आवश्यक आहे. जेणेकरून गर्भाशयाशी संबंधित कोणताही धोका टाळता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या