नवी दिल्ली, 05 जुलै : जुलै महिन्यामध्ये (July Month) जन्मलेल्या लोकांचा स्वभाव (Nature) ओळखणं जरा कठीणच असतं . या महिन्यात जन्मलेले लोक मूडी (Moody People) असतात. त्यामुळे यांच्याशी मैत्री करताना जपून करावी. हे लोक पाहता-पाहता कधी हसायला लागतात तर, कधी अचानक त्यांना राग येतो. जुलै महिन्यात जन्म घेतलेले लोक डोक्यापेक्षा मनाने विचार करणारे असतात. हे लोक भित्रे असतात आणि संकटात साथ सोडतात**.** या महिन्यामध्ये जन्माला आलेले लोक इतरांच्या भावनांचा आदर करतात, सन्मान करतात मात्र, वेळ पडली तर, धोका द्यायलाही कमी करत नाहीत. ( साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांनी प्रकृती सांभाळा; कसा जाईल तुमचा आठवडा ) या लोकांनी एकदा मनात विचार केला की, त्या गोष्टी तडीस नेतात. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळेच जिद्दी स्वभावाचे असतात. जुलै महिन्यात जन्माला आलेले लोक भांडण-तंटा करत नाहीत. त्यांचा स्वभाव अतिशय गोड असतो. ( अरे बापरे! वाळवंट नसूनही या गावात थेंबभरही पाऊस पडत नाही; कसे जगतात इथले लोक? ) लोकांशीनेहमीच सलोख्याने वागतात. त्यामुळेच त्यांची मैत्री लवकर होते. या महिन्यात जन्माला आलेले लोक कलेच्या क्षेत्रात काम करतात. ( केसांच्या सगळ्या समस्या संपवणारे ‘हे’ उपाय; एकदा करूनच पाहा ) सिनेमा, मिडिया या क्षेत्रात त्यांनी हात आजमावला तर प्रसिद्धी मिळते. बिजनेसमध्ये यांना यश मिळतं. समाजामध्ये सन्मान प्राप्त करतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)