नवी दिल्ली, 07 एप्रिल : 12 वर्षांच्या मुलीच्या पोटात गेल्या चार ते पाच वर्षांपासून तीव्र वेदना (Stomach pain) होत होत्या. हळूहळू तिच्या पोटाचा आकार (stomach size incrase) वाढत गेला. तिचं पोट इतकं मोठं झालं की तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. अखेर तिच्या कुटुंबाने तिला रुग्णालयात नेलं. तिथं तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का (Tumor in stomach) बसला. पोटात तीव्र वेदना आणि पोटाचा आकार वाढला म्हणून या मुलीला दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तिच्या पोटाला सूज नव्हती. पण तरी इतका आकार कसा काय वाढला, याबाबत डॉक्टरही हैराण झाले. पोटाचं वजन खूप होतं. म्हणून अखेर डॉक्टरांनी तिच्या पोटाचं सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅनमध्ये तिच्या पोटात काहीतरी फुटबॉलच्या आकाराचं असल्याचं दिसलं आणि ते बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हे वाचा - महिला डान्सर Rock, प्रेक्षक शॉक! डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; VIDEO VIRAL शस्त्रक्रियेत डॉक्टरांना आढळलं की तिच्या पोटात दुसरं तिसरं काही नाही तर ट्युमर होता. त्यातही तिची शस्त्रक्रिया करणं म्हणजे खूप आव्हानात्मक होतं. कारण हा ट्युमर पूर्ण पोटात पसरला होता. रक्तवाहिन्या आणि आतड्यांशिवाय शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांशी जोडलेला होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया खूपच कठीण होती. तरी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरित्या केली. तब्बल तीन तास ऑपरेशन करून हा ट्युमर पोटातून बाहेर काढण्यात आला. त्याचा आकार आणि वजन तपासण्यात आलं. जवळपास 30x20x14 आकाराचा हा ट्युमर, म्हणजे दोन मोठ्या फुटबॉलइतका त्याचा आकार होता. हे वाचा - अरे यांना कुणीतरी आवरा! घाई म्हणून ट्रकखालूनच बाईक नेली; चालकाचा प्रताप VIRAL आज तक च्या रिपोर्टनुसार हा ट्युमर आता तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तर ऑपरेशननंतर काही दिवसांतच मुलीला डिस्चार्जही देण्यात आला आहे.