JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'सर्वकाही नष्ट होतंय, पुढचा नंबर आपला', एलन मस्क यांनी दिला आणखी एका संकटाचा इशारा

'सर्वकाही नष्ट होतंय, पुढचा नंबर आपला', एलन मस्क यांनी दिला आणखी एका संकटाचा इशारा

एलन मस्क (Elon Musk) यांनी एका सिद्धांताचा हवाला देत धोक्याचा इशारा दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 11 फेब्रुवारी :  सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या (coronavirus)  संकटाचा सामना करतो आहे. त्यात आता स्पेसएक्स (space x) कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk)  यांनी आणखी एका संकटाचा इशारा दिला आहे. अंतराळातील संकटासंबंधी त्यांनी मोठा दावा केला आहे. अंतराळात असं काही आहे, जे सर्व काही नष्ट करत आहे आणि पुढील नंबर आपला असू शकतो, असं ते म्हणाले. स्पेसएक्स कंपनी एक दिवस  1000 स्‍पेसशिप पाठवणार आहे. ज्यामध्ये 100 टन उपकरण आणि 100 माणसं असतील. हे लोक मंगळ ग्रहावर राहण्यासाठी जातील. 2050 पर्यंत अंतराळात 10 लाख लोक राहतील अशी योजना मस्क यांनी आधी बनवली होती. पण नंतर हे लक्ष्य गाठण्यासाठी अनेक अडचणी आहेत. हेदेखील त्यांनी मान्य केलं. जेव्हा पृथ्वीवरून काही कारणामुळे स्पेसशिप येणं बंद होईल ती कठीण वेळ असेल. मग मंगळ ग्रहावरील लोकांचा मृत्यू होईल का? आणि असं झालं तर याचा अर्थ आपण एका सुरक्षित स्थानावर नाहीत, असंही ते म्हणाले. **हे वाचा -** ‘आता मी चंद्रासारखे दिसेन’, म्हणत तरुणीनं फेस मास्क हटवला आणि दिसला भयंकर चेहरा एलन मस्क यांनी ग्रेट फिल्टर सिद्धांताचा (Great Filter theory) हवाला दिला आहे. जो प्रोफेसर रॉबिन हँसन यांनी सांगितला होता. रॉबिन म्हणाले होते, अंतराळात असं काही आहे, जे संपूर्ण अंतराळात जीवनाचा विस्तार होण्याआधीच त्याला नष्ट करत आहे. अंतराळ हे खूप विस्तृत, अंधारमय, थंड, रिकामं आणि मृतावस्थेत आहे. आपण जिथं पाहू तिथं सर्वकाही मृतच वाटतं. असं रॉबिन 2014 साली म्हणाले होते. हे वाचा -  VIDEO: टेनिस स्टारबरोबर एक दिवस! जिम, सराव, फोटोशूट आणि मुलाची लुडबुड… जेव्हा तुम्ही एलिअन्सला पाहाल तेव्हा तुम्ही त्यांना खूप घाबराल. ते तुमच्यासोबत कसं वागतील याचा विचार करूनच आश्चर्य वाटेल. जर तुम्हाला एलिअन दिसणार नाही, दुसरं काहीच दिसणार नाही तेव्हा तर तुम्हाला जास्त घाबरायला हवं. कारण अंतराळात असं काही आहे, जे सर्वकाही नष्ट करत आहे आणि आपण त्याचा पुढील शिकार असू शकतो, असं रॉबिन यांनी सिद्धांताच्या आधारे सांगितलं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या