JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Sleeping Tips : पाठदुखीसह अनेक समस्या होतील दूर, वाचा उशीशिवाय झोपण्याचे फायदे

Sleeping Tips : पाठदुखीसह अनेक समस्या होतील दूर, वाचा उशीशिवाय झोपण्याचे फायदे

आज आम्ही तुम्हाला उशी न घेता झोपण्याच्या (Sleeping Without Pillow) काही फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत. उशी न घेता झोपल्याने आपली मान आणि पाठीचा कणा योग्य पोजीशनमध्ये राहतो. त्यामुळे आपल्याला कंबर दुखणे, पाठ दुखणे असे त्रास होत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून : उत्तम आरोग्यासाठी आपल्याला संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी हे सर्व गरजेचे असते. मात्र हे सर्व जरी आपण व्यवस्थित पाळले तरीही आपल्याला अनेकदा पाठदुखी, डोकेदुखी असे त्रास होतात. आपण पुरेशी झोप घेऊनही आपल्याला हे त्रास होत असतील तर आपल्याला कदाचित आपल्या झोपेच्या पद्धतींमध्ये आणि सवयींमध्ये (Sleeping Habits) बदल करण्याची गरज असू शकते. तुम्हाला उशी न घेता झोपण्याचे फायदे (Sleeping Without Pillow) माहिती आहेत का ? आज आम्ही तुम्हाला उशी न घेता झोपण्याच्या काही फायद्यांबद्दल (Benefits Of Sleeping Without Pillow) माहिती देणार आहोत. चांगली झोप लागावी म्हणून आपण अनेकदा झोपेच्या पोजिशन बदलून पाहतो. वेगवेगळ्या प्रकारे उशी घेऊन पाहतो. परंतु तम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला उशी न घेतादेखील चांगली झोप लागू शकते. उशी न घेता घेतलेल्या या झोपेमुळे तुम्हाला जास्त फायदा होतो.

पांढऱ्या चहाविषयी तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या काय आहेत फायदे!

उशी न घेता झोपल्याने आपली मान आणि पाठीचा कणा योग्य पोजीशनमध्ये राहतो. त्यामुळे आपल्याला कंबर दुखणे, पाठ दुखणे (Low Back Pain And Back Pain) असे त्रास होत नाही. उशीशिवाय झोपल्याने तुम्हाला स्पॉन्डीलायटिस (Spondylitis) सारख्या समस्येपासूनही अराम मिळू शकतो. उशी न घेता झोपल्यामुळे रात्रभर आपल्या मेंदूपर्यंत रक्ताभिसरण सुरळीत होते त्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा (Headache) त्रास होत नाही. त्याचबरोबर असे झोपल्याने मायग्रेनचा (Migraine) त्रासदेखील संभवत नाही.

Black grapes: आरोग्यासोबत काळी द्राक्षे स्कीनसाठीही आहेत फायदेशीर; फेसपॅकसाठी असा करा वापर

संबंधित बातम्या

रात्रभर उशी न घेता झोपल्याने तुम्हाला चांगली झोप मिळते. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर तणाव, थकवा जाणवत नाही आणि तुमची चिडचिडदेखील होत नाही. झोपेच्या संपूर्ण वेळेदरम्यान आपला चेहरा उशीला संपूर्णपणे चिकलेला असतो. त्यामुळे उशीवर असलेली सर्व धूळ आपल्याला नका तोंडात जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्कीच उशी न घेता झोपण्याचा प्रयत्न करून पाहू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या