JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दररोज 8 तास झोप न झाल्यास होतं शारीरिक नुकसान, ठरु शकतात 'या' दोन सवयी शरीरासाठी घातक

दररोज 8 तास झोप न झाल्यास होतं शारीरिक नुकसान, ठरु शकतात 'या' दोन सवयी शरीरासाठी घातक

सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोपेचं गणित काहीसं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जून: चांगल्या आरोग्यासाठी (Health) पोषक आहार, व्यायाम आदी गोष्टी जशा आवश्यक असतात, तशीच पुरेशा प्रमाणात झोपदेखील (Sleep) आवश्यक असते. दररोज पुरेशी झोप घेणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं असतं. परंतु, सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोपेचं गणित काहीसं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं. शांत झोप येत नाही, झोपेत मध्येच जाग येते, लवकर झोप लागत नाही अशा अनेक समस्या अनेकांना भेडसावतात. झोप न आल्याने किंवा झोपेचं गणित बिघडलं असल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे; पण आजकाल बऱ्याच जणांना बिझी लाइफस्टाइलमुळे फार तर 4-5 तासांची झोप मिळते. पुरेशी झोप न घेतल्यास शारीरिक यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसंच, बरेच दिवस कमी झोप झाल्यास ते जीवघेणं ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. या संदर्भात माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. Heart Disease | ‘या’ भाजीची पानं खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका होतो कमी, वाचा सविस्तर दरम्यान, वेळ नसल्यानं झोप होत नसेल तर तो भाग वेगळा. परंतु वेळ मिळूनही तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर झोप न येण्याचा विकार टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यामध्ये काही वाईट सवयी (Bad Habits) सोडल्यास तुमची झोप न येण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने लावलेला अलार्म एकदा अलार्म (Alarm) वाजल्यानंतर आपण उठणार नाही, असं अनेकांना माहीत असल्याने ते मोबाइल फोनमधलं स्नूझ बटण (Snooze Button) वापरतात. यामुळे अलार्म थोडा वेळ वाजतो आणि अनेक जण तो पुन्हा पुन्हा बंद करतात. तुम्हालाही ही सवय असेल तर ती आजच सोडा. कारण यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित प्रणालीमध्ये तणाव निर्माण होतो, तो आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित (Heart) आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे ही सवय असेल तर ती बदला. दारू आणि गांजाचं व्यसन दारू आणि गांजाचं सेवन आरोग्यासाठी वाईट असतं. यामुळे शरीराच्या अनेक अवयवांचं गंभीर नुकसान होतं. परंतु काही जण इच्छा असूनही ही सवय सोडू शकत नाहीत. नशेमुळे झोप चांगली लागेल, असं अनेकांना वाटतं; पण यात काहीही तथ्य नाही, खरं तर अशा चुकीच्या व्यसनांमुळे झोप येत नाही. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी कधीही दारू आणि गांजाचं, तसंच कोणत्याही अमली पदार्थाचं सेवन करू नका. ‘‘माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा’’ रात्रीच्या वेळी 6 तासांपेक्षा कमी वेळ झोप घेत असलेल्या व्यक्तीचं आयुर्मान (Life Span) 12 टक्क्यांनी कमी होतं, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दररोज किमान 6 ते 8 तास शांत झोप घेण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या