Home /News /maharashtra /

माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर आप्पांची वाजणार शिट्टी!

माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर आप्पांची वाजणार शिट्टी!

धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    कोल्हापूर, 11 जून: कोल्हापूर (Kolhapur) मधून धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) च हे कोल्हापूरचे पैलवान ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी (won) झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Shiv Sena candidate Sanjay Pawar) पराभूत (lost) झाले आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापूर मध्ये भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. राजकारणात ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने तो राजकारणात राहतो. जर लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतामाई गेली तसे राजकारणात होते. माणसाने राजकारणात लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे, असं म्हणत महादेवराव महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना सूचक इशारा दिला आहे. जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही. ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकाला कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव आहे, नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचू शकत नाही असे ते म्हणाले. हरियाणातही महाराष्ट्रासारखाच ड्रामा, एका मतानं कसे हरले Congress चे माकन माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असे सांगत त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यात कोणत्या पद्धतीने स्वागत होईल, असं ही त्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये जल्लोष धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापूर मध्ये भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. बिंदू चौकात ढोल ताशांच्या गजरात थिरकत गुलालाची मुक्त उधळण भाजपच्या वतीने करण्यात आली. यावेळी आता कसे वाटते गार गार वाटते आशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. महाडिक हे उद्या चार वाजता कोल्हापुरात दाखल होत असून ताराराणी चौकातून अंबाबाई मंदिरापर्यंत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. संजय पवार पराभूत अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांना धोबीपछाड दिला. या विजयानंतर भाजपने जोरदार जल्लोष केला. त्याच दरम्यान विधानभवन परिसरात अत्यंत भावूक असा क्षण पहायला मिळाला. धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यावर त्यांच्या मुलाने धावत येत गळाभेट घेतली. भाजपचे संख्याबळ 122 इतकी होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. Diabetic Diet: साखरेपेक्षाही गोड आहेत हे पदार्थ, डायबिटीजचे रुग्णसुद्धा खाऊ शकतात  भाजपकडे एकूण 106 आमदार आणि 7 अपक्ष समर्थक मिळून 113 आकडा होता. त्यामुळे 123 मते भाजपला पहिल्या प्राधान्याची मिळाली. यात 48 मते अनिल बोंडे आणि 48 मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मतं झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. 27 पैकी 17 मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात 3 मतं बविआने महाडिक यांना दिली. एक मत मनसेने दिलं. त्यानंतर 9 मतं अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Kolhapur

    पुढील बातम्या